Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

व्यसनाधीन पतीने पत्नीला जाळले
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

व्यसनाधीन पतीने पत्नीला जाळून ठार मारल्याची घटना भिंगारमधील आलमगीर येथे सोमवारी

 

घडली. विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात आज पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अब्दुल कबीर सय्यद (वय ६५, कारंजा मशीद, झेंडिगेट) यांची मुलगी फरजाना हिचा आलमगीर येथील शेख कलंदर दादा पटेल यांच्याशी २० मे १९९४ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर दीड महिन्यांपासून पती फरजानाचा (३५ वर्षे) शारीरिक व मानसिक छळ करीत असे. दारूचे व्यसन पूर्ण करता यावे, यासाठी तो फरजानाला मजुरीला पाठवत असे. दारूला पैसे न दिल्यास चारित्र्याचा संशय घेऊन बेदम मारहाणही करीत असे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता वादावादी करीत त्याने फरजाना हीस जाळून मारले, अशी फिर्याद अब्दुल सय्यद यांनी दिली आहे.
कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक साईनाथ ठोंबरे, हवालदार भदाणे तपास करीत आहेत. आरोपी शेख कलंदर यास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.