Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे गेट परीक्षेत यश
राहाता, १८ मार्च/वार्ताहर

देशपातळीवर दर वर्षी घेण्यात येणाऱ्या गेट परीक्षेत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील

 

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
प्रसाद कुऱ्हे (९७ टक्के), योगेश जाधव (९७.८२), अनिकेत पैठणकर (९६), दीपक मुसमाडे (९४), मनोज महाडिक (९१), प्रवीण ताजणे (८९), अश्विनी भोसले (८७), प्रताप पवार (७८), अभिनेश चितलवार (८३), निखिल चौधरी (७९) हे विद्यार्थी गेट परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील प्राध्यापक, तसेच शिक्षकेतर सेवकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांचे खासदार बाळासाहेब विखे, शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, जि. प.च्या अध्यक्ष शालिनीताई विखे, मुळा-प्रवरा वीज संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के यांनी अभिनंदन केले आहे.