Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘लिज्जत’च्या राहुरी शाखेची दशकाकडे वाटचाल
राहुरी, १८ मार्च/वार्ताहर

श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापड या उद्योगाने सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले असून, ‘लिज्जत’च्या राहुरी शाखेची दशकाकडे वाटचाल सुरू आहे.

 

सन २००१मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा डॉ. उषा तनपुरे यांच्या पुढाकाराने ‘लिज्जत’ची शाखा येथे सुरू झाली. परिणामी महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. महिला सदस्य दररोज ५ ते ८ किलो पापड लाटतात, अशी माहिती संस्थेच्या संचालिका नीला वेगड यांनी दिली. शहर व परिसराबरोबरच राहुरी कारखाना, मुसळवाडी, बारागाव नांदूर, कोल्हार येथील २००हून अधिक महिलांचा या दैनंदिन उपक्रमात सहभाग असतो. ‘लिज्जत’च्या माध्यमातून परिसरातील महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध झाल्याची माहिती ‘लिज्जत’चे कार्यकारी अधिकारी सुरेश कोते यांनी दिली.लिज्जत उद्योग सुवर्णमहोत्सव साजरा करीत असताना राहुरी शाखा दहाव्या वर्षांंत पदार्पण करीत आहे. नीला वेगड, डॉ. उषा तनपुरे यांच्या उपस्थितीत १३६ महिला सदस्यांना सव्वा लाख रुपये लाभांशाचे वाटप नुकतेच करण्यात आले. लिज्जत पापडच्या अध्यक्षा ज्योती नाईक यांनी राहुरी शाखेबाबत समाधान व्यक्त केले.