Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

पंतप्रधानपदासाठी संघाचा आज अडवाणींना, तर उद्या मोदींना पाठिंबा
संघाची अ.भा. प्रतिनिधी सभा उद्यापासून

मनोज जोशी, नागपूर, १८ मार्च

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा येत्या २० तारखेपासून रेशीमबाग येथे होत असून, येत्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर होत असलेल्या या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आज अडवाणी असले, तरी यानंतर या पदासाठी नरेंद्र मोदींनाच पाठिंबा देण्याचे संघाने निश्चित केले आहे. या सभेत नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. संघाची अ.भा. प्रतिनिधी सभा दरवर्षीच होत असली, तरी दर तीन वर्षांनी नागपूरला होणाऱ्या या बैठकीत आगामी तीन वर्षांसाठी संघटनेच्या कार्यकारिणीची निवड केली जाते.

दिल्ली भारतीय विद्यालय ही जगात नावाजलेली शाळा. फोडलेल्या नारळासारखी अर्धगोलाकार असलेली त्येंची इमारत जगात प्रसिद्ध. या शाळेतून अनेक हुशार विद्यार्थी इले आणि अभ्यास करून गेले. आता या शाळेचा अजूनय नाव टिकून असला तरी पूर्वीसारखो स्टँडर्ड रवक नाय. पूर्वी हयसर प्रवेश मिळवणा सोप्या नव्हता. खरो मेरिटवालोच विद्यार्थी या शाळेत पोची. परंतु काळानुसार सगळाच बदलल्यानी.. हिकडेसुद्धा पैसो आणि घराणेशाहीच्या बळावर प्रवेश मिळूक लागलो. याची सगळ्यांक खंत वाटता, पण करतलोव काय, अशी स्थिती आसा.. आज शाळेत मोठी लगबग होती. धाहवीच्या नवीन बॅचचो प्रवेश सुरू झाल्यानी.

राज ठाकरे नाशिकमध्ये शनिवारी फोडणार प्रचाराचा नारळ
नाशिक, १८ मार्च / प्रतिनिधी

पक्ष स्थापनेनंतर प्रथमच लोकसभेसारख्या सर्वव्यापी निवडणुकीला सामोरे जाताना राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा नारळ नाशकात फोडण्याचा निर्णय घेतल्याच्या परिणामी येत्या शनिवारी येथे होत असलेल्या त्यांच्या प्रचारसभेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. ज्या ठिकाणी पंधरवडय़ापूर्वी राष्ट्रवादीचे अधिवेशन झाले त्याच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित सभेच्या निमित्ताने मनसे शक्तीप्रदर्शन करणार असून या सभेत मनसेच्या काही उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.एक स्टेप.. चुकलेली!
१९७७ पासून इंदिरा गांधी यांच्या विरोधात तयार झालेले वातावरण दीड वर्षांतच खरे तर बदलत होते; तथापि महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांना त्याचा अंदाज आला नाही. इंदिराजींबरोबर जाण्यात फायदा नाही; महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांचाच प्रभाव आहे आणि पुढेही राहील असे समजणाऱ्यांमध्ये मधुकरराव चौधरी यांच्यासारखे लोकही होते. वसंतराव नाईक वगैरे मंडळी इंदिराजींबरोबर राहिली; तसे मधुकरराव राहिले असते तर १९८० च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस (आय)चा जळगाव मतदारसंघातील उमेदवार म्हणून ते Hobson's Choicel ठरले असते; परंतु ते चव्हाण-रेड्डी काँग्रेसकडे गेल्याने लोकसभेत जाण्याची त्यांची संधी हुकली.

राजकारणांच्या कुंडल्यांद्वारे अभ्यास
यवतमाळ, १८ मार्च / वार्ताहर

विज्ञानवादी दृष्टिकोनाचा कोणी कितीही आग्रह बाळगत असला तरी राजाकारण्यांना अखेर ज्योतिष्य सांगणाऱ्यांचा आश्रय घ्यावाच लागतो आणि काय बरे वाईट होईल, याचा अंदाज बांधावा लागतो, असे चित्र यवतमाळ-वाशीम मतदारसंघात सध्या पहायला मिळत आहे. उमेदवारी मिळाली यासाठी काँग्रेसमध्ये उत्तमराव पाटील व हरिभाऊ राठोड हे दोघे खासदार आणि माजीमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे चाहते ज्योतिष्यांकडे त्यांच्या जन्मकुंडल्या घेऊन गेल्याची चर्चा आहे.

राज्यातून किमान १२ खासदार निवडून आणण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट
अंतुले व मुकुल वासनिक यांना उमेदवारी
मुंबई, १८ मार्च / खास प्रतिनिधी
शरद पवार यांना पंतप्रधानपद मिळावे म्हणून राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यावर राष्ट्रवादीचा भर असताना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातून किमान १२ खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार राज्यातील नेत्यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे अपेक्षेप्रमाणे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच रामटेकमधून मुकूल वासनिक यांना उभे राहण्याची सूचना पक्षाने केली आहे.

स्टार न्यूजच्या ‘कौन बनेगा प्रधानमंत्री’ कार्यक्रमात भारनियमनाच्या मुद्यावरून भडका
नागपूर, १८ मार्च / प्रतिनिधी

स्टार न्यूजच्या ‘कौन बनेगा प्रधानमंत्री’ कार्यक्रमात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि भाजपचे बनवारीलाल पुरोहित आमने-सामने येताच भारनियमनाच्या मुद्यावरून गोंधळ झाला. विधानभवन परिसरातून या कार्यक्रमाचे बुधवारी थेट प्रक्षेपण सुरू असताना गोंधळ झाल्याने कार्यक्रम गुंडाळावा लागला.

बिहार माझी ताकद आणि कमजोरीही-शत्रुघ्न सिन्हा
नवी दिल्ली, १८ मार्च / पी.टी.आय.

पाटणा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊन माझा आत्मसन्मान कायम ठेवल्याची भावना व्यक्त करतानाच शॉटगन शत्रुघ्न सिन्हा याने बिहार हा माझी ताकद व कमजोरीही असल्याची भावना व्यक्त केली. पक्षाने मला यावेळी पाटणा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून त्याचा आपणाला अत्यंत आनंद होत असल्याचेही तो म्हणाला. या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने शत्रुघ्न समाजवादी पक्षाकडे जाणार असल्याची चर्चा मंगळवारी होती. पण अखेर भाजपने त्याला उमेदवारी देऊन या विषयावर पडदा टाकला. मी यापूर्वी दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेलो होतो पण यावेळी पाटण्यातून उभे राहण्याची निश्चय केला होता कारण हा मतदारसंघ माझा पहिला दुसरा तसेच शेवटचा पर्याय होता. याची जाणीव पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी घेतली व उमेदवारी देऊन माझा बहुमान केला असे शत्रुघ्न म्हणाला.