Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राजकारणांच्या कुंडल्यांद्वारे अभ्यास
यवतमाळ, १८ मार्च / वार्ताहर

विज्ञानवादी दृष्टिकोनाचा कोणी कितीही आग्रह बाळगत असला तरी राजाकारण्यांना अखेर ज्योतिष्य

 

सांगणाऱ्यांचा आश्रय घ्यावाच लागतो आणि काय बरे वाईट होईल, याचा अंदाज बांधावा लागतो, असे चित्र यवतमाळ-वाशीम मतदारसंघात सध्या पहायला मिळत आहे.
उमेदवारी मिळाली यासाठी काँग्रेसमध्ये उत्तमराव पाटील व हरिभाऊ राठोड हे दोघे खासदार आणि माजीमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे चाहते ज्योतिष्यांकडे त्यांच्या जन्मकुंडल्या घेऊन गेल्याची चर्चा आहे.
उत्तमराव पाटील यांनी काँग्रेसतर्फे सात वेळा लोकसभेची निवडणूक लढवली व सहा वेळा निवडून आले. हरिभाऊ राठोड दोनदा लढले. पैकी एकदा पराभूत झाले. माणिकराव ठाकरे काँग्रेसतर्फे चार वेळा विधानसभा निवडणूक लढले. एकदाच पराभूत झाले. दोनदा ते मंत्री होते. आता आमदार नाहीत पण प्रदेशाध्यक्ष आहेत आणि खासदार होण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. उत्तमराव पाटलांची वृषभ रास असून त्यांना ५ वा गुरू ४ था शनि आहे. हरिभाऊ राठोड यांची रास कर्क असून त्यांना ७ वा गुरू व १० वा सूर्य आहे. माणिकराव ठाकरेंची रास सिंह असून त्यांना ६ वा गुरूआहे. ज्योतिष्यशास्त्रात ४ था, ८ वा आणि १२ वा गुरू ‘अमंगल’ कारी समजल्या जातो तर ‘साडेसाती’ ची दशा देखील वाईट समजली जाते.
सेनेत भावना गवळींना उमेदवारी मिळाली आहे. त्यांना यावेळी विजयाची ‘हॅट्रीक’ करायची आहे. भावनाची रास धनु असून त्यांना ३ रा गुरू सुरू आहे. चंद्र पहिला आणि सूर्य ५ वा सुरू आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार भावना गवळींचे सितारे बुलंद दिसतात त्या खालोखाल हरिभाऊ राठोड यांचे सितारे जोरात आहेत. अर्थात ज्योतिष्यशास्त्र हा करमणुकीसाठी चांगला विषय असल्याचे अनेक बुद्धिवादी मानतात.