Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९प्रेम
या शब्दाला त्या भावनेला बिचकणारी, प्रेमाच्या नुसत्या उल्लेखाने दचकणारी माणसे समाजात जास्त दिसतात. माणसे वेगवेगळ्या नात्यांमधील प्रेमाच्या विविध रूपाना लक्षात घेत नाहीत. केवळ स्त्री-पुरुषातील शारीरिक, मानसिक आकर्षणाला त्यातून व्यक्त होणाऱ्या लैंगिकतेला प्रामुख्याने प्रेम समजले जाते. निरंतर एकत्र जगण्याच्या आणाभाका घ्यायला लावणारं प्रेम आपण विचारात घेऊ. यात सोयीसाठी प्रिय व्यक्ती ही स्त्री समजून तसा उल्लेख करू. समाजात प्रेमाच्या नावाखाली, एकतर्फी प्रेमापोटी घडणारी हिंसा व दैनंदिन जीवनात चालणारी दडपशाही लक्षात घेता ‘सेक्स एज्युकेशन’ बाजूला तात्पुरतं बाजूला ठेवून अगोदर ‘लव्ह एज्युकेशन’ समाजातील विविध घटकांना मिळायला हवं, असं मला वाटतं. हाताशी लागलं, लाबलं ते प्रेम की निव्वळ तात्पुरतं आकर्षण हे प्रेमिकांना समजायला हवं. त्यात पुन्हा प्रेमाची चिकित्सा करताना प्रेमाचा रंग, गंध, स्पर्श हरवणारं नाही, याची काळजी घ्यायला हवी. विच्छेदनाने रचना समजते खरी पण चैतन्य नसिटून जाते. तसे व्हायला नको.

‘नादा’चा गौरव!
कोणतीही कला ही प्रशिक्षणाची गुलाम नसते. तिला योग्य वातावरण मिळालं, की ती आपोआपच स्वत:चा मार्ग चोखाळते आणि स्वत:चे स्थान पटकावते. चित्रकलेचं कुठलंही रीतसर शिक्षण न घेता चित्रकला क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्याची ही कथा. चित्रकार किशोर नादावडेकर हे त्या चित्रकाराचं नाव. किशोर एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा अर्थातच गरिबी आवासून उभीच होती. त्याच्या लहानपणीच आई गेल्यामुळे कुटुंबाचे हाल होत होते. किशोर सर्वात मोठा त्यामुळे त्यावर भावंडांची आणि आर्थिक जबाबदाऱ्याही होत्याच. त्याचे डोंबिवलीचे मामा हे जाहिरात एजन्सीत लॅग्वेज आर्टिस्ट म्हणून काम करीत होते. किशोरच्या चित्रकलेचं लहानपणापासूनच्या वेडाविषयी त्यांना माहीतच होतं. वडिलांना चार पैशाचा आधारही व्हावा व मुलाला चित्रकलेचं ज्ञानही व्हावं या उद्देशानेच त्यांनी एका मोठय़ा जाहिरात कंपनीत किशोरला नेलं आणि त्याच पाच वर्षांत किशोरच्या जिद्दीने आकार घ्यायला सुरुवात केली. वाट्टेल ती कामे करीत त्यांच्या कामाने व मृदू स्वभावामुळे सर्वाची मने त्याने जिंकली.शाळा म्हणजे केवळ संस्कारकेंद्र नाही, तर ती उत्तम दुकानदारी होऊ शकते आणि परीक्षाकेंद्र म्हणजे वर्षांला लाखो रुपये मिळवून देणारे खात्रीचे साधन होऊ शकते, असा वस्तुपाठ परभणी जिल्ह्य़ातल्या नवश्रीमंत शिक्षणसम्राटांनी घालून दिला होता. हा ‘उद्योग’ गेल्या पाच वर्षांत तर कमालीचा भरभराटीला आला. शिक्षणाधिकाऱ्यांच्या उदार आश्रयाने या उद्योगाला नवी झळाळी आली. या साऱ्या गोष्टींनी कळस गाठला, तेव्हा जिल्ह्य़ात दहावी-बारावीच्या परीक्षा ‘कॉपी’मुक्त वातावरणात पार पाडायचा निर्णय जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांनी घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी झाली ती कठोर अशा कारवायांमुळे पण त्यामुळे गुणवत्तेचाच काळाबाजार थांबला गेला.