Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
अ‍ॅव्हॉन
अ‍ॅव्हॉनने अ‍ॅडव्हान्स टेक्निक्स कीप क्लीअर शाम्पू अ‍ॅण्ड कंडिशनर बाजारात आणले आहे. या टू इन वन फॉम्र्युलामुळे कोंडयापासून केसांची सुटका होते व केस मुलायमही होतात.

 

वी लाइन ज्वेल्सची नवीन घडय़ाळे
वी लाइन ज्वेल्सने गोलाना ही घडय़ाळांची नवी रेंज सादर केली आहे. ही घडय़ाळे १० हजार ते ५२ हजार पर्यंतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. स्त्रिया व पुरुष दोघांसाठीही हे कलेक्शन उपलब्ध आहे.

हार्पिक
हार्पिक पॉवर हे उत्पादन आता गुलाब आणि संत्र्याच्या सुगंधात उपलब्ध आहे. हार्पिक पॉवरची ही नवी रेंज ५०० मिलीची बाटली ५२ रुपये व ७५० मिलीची बाटली ७२ रुपयांत उपलब्ध आहे.

 

कोहलर किचन
कोहलर किचनने किचनची नवी रेंज भारतात उपलब्ध केली आहे. फ्रेंच डिझायनर्सनी या किचनची मॉडेल्स तयार केली आहेत. खास भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून ही किचनची रेंज सादर करण्यात आली आहे. ४ लाख ते १२ लाख रुपयांपर्यंतच्या किंमतीत ही रेंज उपलब्ध आहे.

मॅस्पर
मॅस्पर या होम फॅशन कंपनीनी ‘इटर्नल ब्युटी’ हे नवीन समर कलेक्शन सादर केले आहे. उशा, गाद्यांना असलेले नैसर्गिक रंग हे या कलेक्शनचे खास वैशिष्टय़ आहे. व्हॅनिला, पूल ब्ल्यू, अ‍ॅक्विश, कोस्टल ब्ल्यू टाईड, रीगल ब्ल्यू, वेड्ज वुड ब्ल्यू आणि ग्रीन हेज या विविध रंगात २२५ ते ५,४९५ रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये हे कलेक्शन उपलब्ध आहे.