Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मटका कुल्फीची दुकाने थाटली
नागपूर, १९ एप्रिल/ प्रतिनिधी

शहरात नावाजलेल्या आईस्क्रीमची दुकाने चौकाचौकात असूनही उन्हाळ्यात सर्वसामान्य माणसांची धाव असते ती रस्त्यावर थाटलेल्या मटका कुल्फीवरच.
उन्हाळाची चाहूल लागली की हात ठेल्यावर किंवा चौकात मिळेल त्या जागी उभे राहून छोटे व्यवसायिक व्यवसाय करीत असतात. २ ते १० रुपयापर्यंत मिळणारी ही

 

मटका कुल्फी खाण्याचा मोह मुलेच नव्हे तर वडीलधारी मंडळींना आवरत नाही. आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या विविध कंपन्याच्या आईस्क्रीम ब्रॅण्डमध्ये कितीही स्पर्धा असली तरी मटका कुल्फीची लोकप्रियता मात्र तिच्या माफक किमतीमुळे आणि लज्जतदार चवीमुळे टिकून आहे. लाल रंगाचे कापड गुंडाळलेल्या माठात ठेवलली मटका कुल्फी शहरातील विविध भागात आज मिळत आहे. शहरातील अनेक हॉटेलमालकांनी दुकानासमोर या मटका कुल्फी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. मटका कुल्फीसोबत खव्याच्या कुल्फीची चांगली मागणी आहे. उन्हाळ्यामध्ये विदर्भात मोठय़ा प्रमाणात भय्ये केवळ व्यवसायासाठी येत असतात. या धंद्याच्या भरवश्यावर अनेक भय्ये स्थायिक झाले आहेत. मटका कुल्फी बनवण्यासाठी दूध तापवून त्यात ठराविक प्रमाणात खवा मिसळतात. शिवाय प्रमाणानुसार साखर, काजू, पिस्ता व बदाम, यांचे मिश्रण केले जाते. हे मिश्रण व्यवस्थित कालवून जस्ताच्या साच्यात टाकत असतात. त्याला झाकण लावतात व हे झाकण घट्ट रहावे म्हणून त्याला घट्ट बांधतात नंतर हे साचे बर्फ ठेवलेल्या माठात टाकतात. त्यात मीठही टाकतात. ही प्रक्रिया साधारणत सकाळी केली जाते. बर्फामुळे साच्यातील मिश्रण घट्टे होते व त्याची कु ल्फी तयार होते.
शहरात महाल, गांधीबाग, सीताबर्डी, सदर छावणी, खामला, प्रतापनगर, इतवारी, गोकुळपेठ आदी भागात कुल्फी विकणारे दिसून येतात. शिवाय हातठेल्यावर कुल्फीचा माठ घेऊन हे भय्ये वस्त्यांमध्ये फिरून घरपोच सेवाही देत असतात. या व्यवसायात जवळपास ४० टक्के नफा असल्याचे महाल भागात मटका कुल्फीची विक्री करणारा रामप्रसादने सांगितले.