Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

स्नेहा क्लासेसतर्फे विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्सेस
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

आयआयटी जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्नेहा टय़ूशन क्लासेसतर्फे त्यांच्या केंद्रांवर रँक प्रमोटिंग पॅकेजसह विविध क्रॅश कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. क्लासेसतर्फे

 

नागपुरात प्रथमच प्रमोटिंग पॅकेजेस देण्यात येत आहेत.
आयआयटी जेईई परीक्षेसाठी स्नेहा टय़ूशन क्लासेसतर्फे अभ्यासाचे १० भागात विभाजन करण्यात आले आहे. या परीक्षांमध्ये गेल्या ३० वर्षांत एकच प्रश्न पुन्हा प्रकाशित झाला नाही. त्यामुळे आजपर्यंत न विचारलेल्या १५० प्रश्नांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमावर जवळपास १५०० नवीन प्रश्न तयार करण्यात आले आहेत. हा संपूर्ण अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी रसायनशास्त्राचा १४ वर्षांचा अनुभव असलेले बी.एन.रे, भौतिकशास्त्रासाठी रवी मोहन वर्मा, गणितासाठी प्रा. झा हे तज्ज्ञ प्राध्यापक माहिती देणार आहेत. या अभ्यासक्रमासाठी १२ हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासोबतच एआयईईईचा १ महिन्याचा क्रॅश कोर्सही क्लासेसतर्फे १५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. १२ वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम असून याद्वारे नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या अभ्यासक्रमाचा राज्यपातळीवरील अभियांत्रिकीमध्ये प्रवेशासाठीच्या एसईईई परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी १० हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. ७ मे रोजी राज्यपातळीवर घेण्यात येणाऱ्या पीएमटी एसईईई परीक्षेसाठी ४० दिवसांचा क्रॅश कोर्स घेण्यात येत आहे. यासाठी संस्थेच्या नंदनवन आणि सीताबर्डी शाखांमध्ये विद्यार्थ्यांना महिती देण्यात येणार आहे. सर्व अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांकडे लक्ष देता यावे यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. तसेच प्रथम येणाऱ्यास संधी देण्यात येणार असल्याचे स्नेहा टय़ूशन क्लासेसच्या संचालिका प्रा. स्नेहा बोंद्रे यांनी कळवले आहे.