Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

औरंगाबादमध्ये ३० मार्चपासून नाटय़ चळवळीवर चर्चासत्र
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाच्यावतीने ३० आणि ३१ मार्चला ‘प्रादेशिक मराठी रंगभूमी : स्वरूप आणि आव्हाने’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र

 

आयोजित करण्यात आले आहे.
चर्चासत्राचे उद्घाटन ख्यातनाम रंगकर्मी तसेच चित्रपट अभिनेते डॉ. मोहन आगाशे करणार असून, समारोप प्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे.
प्रादेशिक रंगभूमीची चळवळ गतिमान व्हावी, या दृष्टीने या चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शोधनिबंध मागवण्यात आले आहेत. निबंधांचे उपविषय प्रादेशिक रंगभूमी आणि परंपरा, प्रादेशिक रंगभूमी आणि प्रायोगिकता, प्रादेशिक रंगभूमी आणि जागतिकीकरण, प्रादेशिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी, प्रादेशिक रंगभूमी : अध्यापन, संशोधन, जतन, संवर्धन असे आहे.
निवडलेल्या कोणत्याही एका विषयाच्या शोधनिबंधाचा सारांश २० मार्चपूर्वी स्वत:च्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह आणि अल्पपरिचयासह पाठवावा. हा सारांश पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नाटय़शास्त्र विभागप्रमुखांनी कळवले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर, विभागप्रमुख, नाटय़शास्त्रविभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, या पत्त्यावर (मोबाईल ०९४२३१४९९८८) किंवा प्रा. डॉ. जयंत शेवतेकर (०९८५००१४०९४४), प्रा. डॉ. सतीश पावडे (०९३७२१५०१५८) यांच्याशी संपर्क साधावा.