Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पोलीस समन्वय समितीचा उपक्रम मोलाचा -खरात
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

आदर्श होळीची संकल्पना ही समाजासाठी अतिशय मोलीची असून ती शहरात राबवली गेल्यास पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागणार नाही. गुन्हेगारीवर आळा बसण्याकरिता पोलीस समन्वय समितीचा उपक्रम अतिशय मोलाचा आहे, असे प्रतिपादन सहाय पोलीस आयुक्त वामन खरात यांनी

 

केले.
पोलीस नागरिक समन्वय समिती व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस नागरिक समन्वय ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम होळी पाडव्याला आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित होते. वॉर्ड क्रमांक १०१ चे प्रवीण राऊत, दीपक धुरडे, चक्रधर सुदर्शन आणि डॉ. विठ्ठल सावरबांधे आदी यावेळी उपस्थित होते. होळी आणि वास्तव या विषयावर उपस्थितांची भाषणे झाली. होळी म्हणजे लाकडे जाळणे, तोंडाला काळे फासणे, वेडेवाकडे नृत्य करणे, मासाहार करणे हे नसून यादिवशी दरुगध, व्यसन, अज्ञान, आळस जाळून टाकावा, असे मत उपस्थितांनी मांडले.
प्रास्ताविक पुरुषोत्तम थुटे यांनी केले. संचालन राजेंद्र भोंडे यांनी केले. स्वागत अरविंद रतुडी यांनी तर, प्रमोद माळवे यांनी आभार मानले.
रामराव इमाने, विनायक भुते, डॉ. संजय भुते, डॉ. सुशांत पिसे, ज्योत्सना भगत, प्रभा गावंडे, पावडे, शालू गावंडे, उमा उमाठे आदींचे यावेळी सहकार्य मिळाले.