Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

विमलताई ठकार यांना सवरेदय आश्रमात श्रद्धांजली
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

सवरेदयी नेत्या दिवं. विमलताई ठकार यांना सवरेदय आश्रमात आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी वासुदेवराव चोरघडे होते. याप्रसंगी सवरेदय आश्रमाचे

 

अध्यक्ष डॉ. सुरेश पांढरीपांडे व डॉ. प्रकाश पाटील उपस्थित होते.
वासुदेवराव चोरघडे म्हणाले, दिवं. विमलताईंचा अधिकार मोठा होता. त्या जीवनाच्या अंतिम आनंद अवस्थेत पोहोचल्या होत्या. अध्यात्म त्यांच्या जीवनाचे शास्त्र होते. अध्यात्म हाच त्यांनी जीवनसाधनेचा प्रवास मानला.
दिवं. विमलताईंच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. दमयंती पांढरीपांडे म्हणाल्या विमलताईंनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याचप्रमाणे आचार्य विनोबाजींसोबत भूदान चळवळीत काम केले. त्यांच्यानंतरही त्यांचे काम निरंतर सुरूच होते. विमलताई नव्या काळाला मिळालेले स्त्रीविचाराचे योगदान होते. डॉ. मा.म. गडकरी, जे. कृष्णमूर्ती यांचे संदेश जगभर पोहोचवण्याचे काम त्यांनी केले, असेही त्या म्हणाल्या. जवाहर वडीये म्हणाले, विमलताई अध्यात्म पथगामी होत्या.
आत्मसाक्षात्कार हेच विमलताईंचे जीवन होते, त्यांचा मार्ग समाजपरिवर्तनातून गेला होता. त्यांनी परंपरागत जीवनदृष्टीचा लाभ घेतला नाही. त्यांनी जीवनात शांती व क्रांतीच्या माध्यमातून साधना केली, असे डॉ. सुरेश पांढरीपांडे म्हणाले. शेवटी दोन मिनिटे मौन पाळून दिवं. विमलताईंना भावपूर्णश्रद्धांजली अर्पण करण्यात आली.