Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

गांधीसागर तलावाच्या सुरक्षेसंदर्भात नागरिक सुरक्षा मंचचे निवेदन
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

गांधीसागर तलावाची सुरक्षा व्यवस्था योग्य नसल्यामुळे याठिकाणी आत्महत्या वाढत आहेत. यासंदर्भात नागरिक सुरक्षा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त उपनिगम आयुक्त बोखड यांना

 

तलावाची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी, यासंदर्भात मंचने निवेदन दिले.
गांधीसागर तलावाच्या चारही बाजूने पाच फूट उंच तटबंदी असावी, चारही बाजूंचे सौंदर्यीकरण करतानाच त्याठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, गांधीसागर तलावात बोटींगची व्यवस्था करून चांगले पर्यटनस्थळ म्हणून त्याचा विकास करावा, अशी मागणी नागरिक सुरक्षा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
या मागण्यांवर चर्चा करताना अतिरिक्त उपनिगम आयुक्त बोखड म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधीसागर तलावाचे पुन्हा सौंदर्यीकरण करून याठिकाणी होणाऱ्या आत्महत्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी एक योजना तयार केली आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असून, गांधीबाग झोनला तसे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिक सुरक्षा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेबद्दल अतिरिक्त उपनिगम आयुक्तांचे आभार मानले. शिष्टमंडळात नागरिक सुरक्षा मंचचे अध्यक्ष शफीक खान, सल्लागार बाबा हाडके, कोषाध्यक्ष मो. अशफाक, सचिव महेश झाडे, शेख युसूफ आदींचा सहभाग होता.