Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शिक्षक सहकारी बँकेची २९ मार्चला निवडणूक
नागपूर, १९ मार्च / प्रतिनिधी

शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक २९ मार्च होणार आहे. संचालक मंडळाचे चुकीचे धोरण, अकार्यक्षम नेतृत्व व भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याने बँक तोटय़ात आली आहे, असा आरोप करून निवडून देण्याचे आवाहन बहुजन पॅनेलचे धर्मराज रेवतकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

 

शिक्षक सहकारी बँकेत संचालक मंडळावर असलेल्या पॅनेलमुळे बँकेला ४२.५० कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. त्यामुळे भागधारकांचे २५ कोटी रुपयांचे भागभांडवल धोक्यात आले आहे. बँकेच्या चुकीच्या धोरणांमुळे कलम ८८ अंतर्गत संचालक मंडळावर कारवाई होऊ नये म्हणून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोपही रेवतकर यांनी केला. बँकेतील कर्मचाऱ्यांवर दवाब आणून भागभांडवल घेण्यासाठी त्यांना बँकेतून कर्ज देऊन भाग भांडवल वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गेल्या २४ वर्षांपासून बँकेचे सभासद असलेल्यांना चार वर्षांपासून लाभांशाचे वितरण बंद करण्यात आले आहे.
या निवडणुकीत दिवंगत प्रभाकर दटके आणि दिवं. अशोक वाडीभस्मे यांच्या समर्थकांनी बहुजन सहकारी पॅनेल तयार केले आहे.
तोटय़ात व डबघाईस आलेली बँक नफ्यात आणण्यासाठी, आर्थिक व्यवस्थापनात सुधारणा व नियोजन करून नफा मिळवणे तसेच गेल्या पाचवर्षांपासून बंद झालेला लाभांश वितरण सुरू करणे, बेजवाबदार, आकार्यक्षम व भ्रष्टसंचालकाला धडा शिकविण्यासाठी आणि इतर विविध मुद्यांसाठी सहकारी पॅनेलाला निवडून देण्याचे आवाहन रेवतकर यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला विजय खवास, जितेंद्र कुळकर्णी, नाना ढगे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.