Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९

सोलापूरच्या ज्ञान प्रबोधिनीचा ‘जीवनराई’ नावाचा वार्षिक वृत्ताचा अंक अलीकडेच केव्हातरी हाती आला. त्याच्या ‘जीवनराई’ या शीर्षकाशी मन रेंगाळत राहिले.. ‘देवराई’ हा शब्द यापूर्वी वाचला होता, ऐकला होता, देवराई पाहिलीही होती; पण ‘जीवनराई’ हा शब्द आणि त्यातून अभिप्रेत असणारी संकल्पना तशी नवी होती.. अंक चाळायला घेतला, एकेका लेखाच्या तपशिलात शिरत गेलो, तेव्हा ‘जीवनराई’ या शब्दात दडलेलं एक मोठं विश्व अकल्पितपणे डोळ्यांसमोर उघडत गेलं.. हे विश्व होतं सुकलेल्या रानामध्ये ‘जीवनराई’ रुजविण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीचं.. अशी धडपड उभी करण्याचं, असं चैतन्य प्रत्यक्षपणे खेळविण्याचं, काम ज्ञान प्रबोधिनीची सोलापूर शाखा गेली वीस र्वष करते आहे.. २२ जानेवारी १९८९ ला सोलापूर शहरातल्या बालविकास मंदिराचं काम अवंतिकाबाई आणि जनुभाऊ केळकरांनी ज्ञान प्रबोधिनीकडे सोपविलं, तेव्हापासूनचा हा अथक प्रवास..पाकिस्तानात
वायव्य सरहद्द प्रांतात स्वात खोऱ्यासह सर्वच आदिवासीबहुल भागांत अस्थिरता आहे. या अस्थिरतेचे धागेदोरे जसे तालिबानी व दहशतवादी चळवळीत आहेत त्याचप्रमाणे आणखी एका मुद्दय़ाशी ते निगडित आहेत. सध्या विस्मरणात गेलेला हा मुद्दा आहे अखंड भारतातील संस्थानांचा! आपल्याकडे अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘गुलाल’ या चित्रपटातही राजस्थानातील संस्थानिकांमधील असंतोषाचे सूचक काल्पनिक चित्रण आहे. विलिनीकरणाने दुखावलेल्या या संस्थानिकांच्या मनातील सत्ताकांक्षेतून एक फुटीर चळवळ उभी राहाते, असे हे चित्रण काल्पनिक असले तरी पाकिस्तानलगतच्या राजस्थानात भविष्यात असा धोका उद्भवूही शकतो, याचे हे सूचनदेखील आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री बारा वाजता ब्रिटिश सत्ता सोडणार होते.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वत्र राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू असतानाच नागपुरातील नर्सरी ते केजीपर्यंतच्या प्रवेशांसाठीही पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या समीकरणाची जुळवाजुळव सुरू केलेली आहे. प्री नर्सरी, नर्सरी आणि केजीच्या प्रवेशासाठी बऱ्याच शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियाही सुरू झालेल्या आहेत. नवीन शैक्षणिक सत्रापासून या तुकडय़ांना प्रवेश घेताना यंदा प्रथमच पालकांच्या मागे मुलाखतींचा ससेमिरा राहणार नसल्यामुळे त्यांच्या मनावरील मणभर ओझे कमी झालेले आहे. शाळा जितकी दर्जेदार तितकेच प्रारंभीचे प्रवेश शुल्क आणि महिन्याची फीसुद्धा दर्जेदारच द्यावी लागते. याशिवाय, एकविसाव्या शतकाच्या स्पर्धात्मक युगाला आपले मुल सामोरे जाणार आहे म्हटल्यावर त्याला तद्दन मराठमोळ्या शाळेत घालून चालणार नाही. असे करणे म्हणजे फारच बिलो डिग्निटीचे वगैरे दिसेल म्हणून दरवर्षीच पालकांचा ओढा कॉन्व्हेंट कल्चरकडे वाढत आहे. परिणामत: मराठी शाळा ओस पडतील की काय, अशी भीती या शाळांना जाणवू लागलेली आहे. इंग्रजी माध्यमातूनच मुलांना शिकवण्याच्या अट्टहासामुळे स्वाभाविकच या शाळांच्या रंगरूपात कमालीचा टापटीपपणा आलेला आहे. पूर्वी मुल सहा वर्षांचे झाल्याशिवाय शाळेचे तोंड बघत नसे. एकदम तुकडीत तो धाडला जाई.