Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

कांगारूंचा २०९ धावांत खुर्दा
केप टाऊन, १९ मार्च / ए. पी.

डावखुरा फिरकी गोलंदाज पॉल हॅरिस डेल स्टेन व एन्टीनी यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे येथील

 

तिसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी चहापानानंतर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला २०९ धावांतच गुंडाळले. चहापानाला ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ १५८ धावांतच तंबूत परतला होता. चहापानानंतर पहिल्याच षटकात हॅरिसने जम बसलेल्या हॅडिनला पायचीत करून पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाला आणखी एक हादरा दिला. ६ बाद १५८ वरून मॅक्डोनाल्ड आणि मिशेल जॉन्सन जोडीने सातव्या विकेटसाठी ३२ धावांची भर टाकली. मात्र मखाया एन्टीनीने एकाच षटकांत मॅक्डोनाल्ड आणि पीटर सिडल यांना सलग दोन चेंडूंवर बाद करून ऑस्ट्रेलियाची ८ बाद १९० अशी अवस्था करून टाकली. तर स्टेनने शेवटचे दोन बळी मिळवत त्यांचा डाव २०९ धावांतच गुंडाळला.
तत्पूर्वी सकाळी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिलीप ह्य़ुजेस आणि सायमन कॅटीच या जोडीने सावध सुरुवात करून अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर हॅरिसला स्वीप करण्याच्या प्रयत्नात ह्य़ुजेस (३३) पायचीत ठरला आणि नंतरच्या षटकात कर्णधार पॉन्टिंगही धावांचे खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतला. कसोटी पदार्पण करणाऱ्या अल्बी मॉर्केल याच्या गोलंदाजीवर पुढे सरसावून फटका मारण्याच्या प्रयत्नात पॉन्टिंगने यष्टीरक्षक बाऊचरकडे झेल दिला.
मॉर्केलने आपल्या त्या स्पेलमध्ये ह्य़ुजेसलाही चांगलेच सतावले होते. दरम्यान, उपाहारापूर्वी कॅटीचला एण्टीनीच्या गोलंदाजीवर नवोदित इम्रान खानने जीवदान दिले त्या वेळी त्याच्या केवळ नऊ धावा होत्या.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव :- फिल ह्य़ुजेस पायचित गो. हॅरिस ३३, सायमन कटिच झे. खान गो. हॅरिस ५५, रिकी पॉन्टिंग झे. बाऊचर गो. मॉर्केल ०, माईक हसी त्रि, गो. स्टेन २०, मायकल क्लार्क त्रि. गो. स्टेन ०, ब्रॅड हॅडिन खेळत आहे ४२, ए.बी. मॅक्डोनाल्ड झे. कॅलिस गो. एन्टिनी १३, मिशेल जॉन्सन झे. प्रिन्स गो. स्टेन ३५, पीटर सिडल झे. डि‘व्हिलियर्स गो. एन्टिनी ०, ब्रायस मॅक्गेन झे. डि‘व्हिलियर्स गो. स्टेन २, बेन हिल्फेन्हॉस नाबाद ०, अवांतर (लेगबाईज ६, वाईड १, नोबॉल २) ९. एकूण ७२ षटकात सर्व बाद २०९. बाद क्रम : १-५८, २-५९, ३-८१, ४-८१, ५-१५२, ६- १५८, ७- १९०, ८-१९०, ९-२०९, १०-२०९.
गोलंदाजी : स्टेन १६-५-५६-४, एन्टिनी १७-७-३८-२, कॅलिस १०-२-३१-०, मॉर्केल १२-३-४४-१, हॅरिस १७-५-३४-३.