Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

पाचव्या फेरीत आनंदची गाठ इव्हानच्युकशी
नाइस (फ्रान्स), १९ मार्च / पीटीआय

विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि यूक्रेनचा व्हॅसिली इव्हानच्युक यांच्यात अंबर ब्लाइंडफोल्ड

 

आणि जलदगती बुद्धिबळ अिजक्यपद स्पध्रेच्या पाचव्या फेरीत उद्या लढत रंगणार आहे.
आनंदची या स्पध्रेत चांगली कामगिरी होत नसली तरीही गुरुवारच्या विश्रांतीनंतर त्याच्या खेळात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक फेरीत एक ब्लाइंडफोल्ड आणि एक जलदगती सामन्याचा समावेश असलेल्या या स्पध्रेत आनंदने आठपैकी चार गुण कमविले आहेत.
गतवर्षी जर्मनतील बोन येथे झालेल्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पध्रेतील आनंदचा प्रतिस्पर्धी रशियाचा व्लादिमिर क्रामनिक सर्वसाधारण तालिकेत ५.५ गुणांसह आघाडीवर आहे. तर अर्मेनियाचा लेव्हॉन अरोनियन आणि रशियाचा अ‍ॅलेक्झांडर मोरोझेव्हिच पाच गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.
सात फेऱ्यांचे १४ सामने अद्याप बाकी आहेत. ब्लाइंडफोल्डमध्ये आनंद संयुक्तपणे सातव्या तर जलदगती प्रकारात तो पाचव्या स्थानावर आहे.