Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

राज्य कबड्डी संघटना निवडणूक; चुरस सहचिटणीसपदासाठी
पुणे, १९ मार्च/क्री.प्र.

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदी राज्याचे जलसंपदामंत्री व पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री

 

अजित पवार; तर खजिनदारपदी फिदा कुरेशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे रविवारी मुंबई येथे संघटनेच्या कार्यालयात होणाऱ्या संघटनेच्या वार्षिक निवडणुकीत सहचिटणीसपदाच्या पाच जागांसाठी आठ जणांमध्ये चुरस रंगणार आहे.
अध्यक्षपदासाठी फक्त अजित पवार यांचाच अर्ज आल्यामुळे त्यांची निवड झाली. तसेच खजिनदारपदासाठी कुरेशी यांचाच अर्ज आल्यामुळे त्यांचीही निवड निश्चित आहे. पवार व कुरेशी हे राज्य संघटनेवर पुण्याचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेले आहेत. संघटनेच्या सरकार्यवाहपदी मोहन भावसार हे बिनविरोध निवडून आले आहेत. संघटनेच्या उपाध्यक्षपदासाठी आमदार मदन पाटील (सांगली), सुरेश वरपुडकर (परभणी), रमेश कदम (रत्नागिरी), गणपतराव माने (लातूर), भाई जगताप (मुंबई शहर) यांची निवड निश्चित आहे. सहचिटणीसपदाच्या पाच जागांसाठी मीनानाथ धानजी (मुंबई शहर), सुनील जाधव (अहमदनगर), रमेश प्रभू (मुंबई उपनगर), मुजफ्फर सय्यद (धुळे), राम मोहिते (बीड), रमेश देवाडीकर (ठाणे), गणेश शेट्टी (सांगली), यू. डी. इंगळे (हिंगोली) या आठ संघटकांमध्ये चुरस आहे.