Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २० मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आयसीएल क्रिकेटपटूंना एकदिवसीय संघात स्थान न देण्याची पाकची योजना
कराची, १९ मार्च / पीटीआय

बंडखोर इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) सोबत करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूंना राष्ट्रीय

 

संघात स्थान देण्यात येणार नसल्याची भूमिका पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघ निवड समितीने घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात येणाऱ्या पाक संघात आयसीएलसोबत करारबद्ध असलेल्या खेळाडूंच्या नावाचा विचार होणार नसल्याचे संकेत मिळत
आहे.
आयसीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बंदी घातली आहे. ही बंदी रद्द होत नाही तोपर्यंत आयसीएलसोबत करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूंचा राष्ट्रीय संघासाठी विचार करता येणार नाही, असे निवड समितीच्या एका सदस्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. आयसीएलसोबत करारबद्ध असलेले मोहम्मद युसूफ, अष्टपैलू अब्दुल रझ्झाक, वेगवान गोलंदाज राणा नावेद, इम्रान नझीर आणि इम्रान फरहात यांच्यात राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची प्रतिभा आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असे त्यांनी सांगितले