Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९

पवनारच्या ब्रह्मविद्या मंदिराला येत्या २५ मार्च रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. अध्यात्माची प्रेरणा आणि ब्रह्मचर्याचा संकल्प मनात धरलेल्या विनोबाजींनी या मंदिराची स्थापना केली ती राजस्थानात पदयात्रा करीत असताना, रिमोट पद्धतीने.. आज या आठाच्या तीस भगिनी झाल्या आहेत.. त्यांच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा हा आढावा व त्याविषयीचे हे प्रकट चिंतन.
उंच उडणाऱ्या चंडोल पक्ष्याला वर्डस्वर्थ कवी म्हणतो, ‘हे चंडोल, तू ज्या उंचीवर पोहोचला आहेस, त्या उंचीवर मला घेऊन जा. तेथे चहूकडे एक वेडेपणा पसरलेला आहे आणि येथे माझ्या चारी बाजूला शहाणपण आहे, या शहाणपणाचा मला कंटाळा आला आहे. तू मला तुझ्या उंचीवर घेऊन जा किंवा तेथे कसे पोहोचायचे ते शिकव.’ प्रापंचिक किंवा भौतिक विचारांच्या वर जाऊन विश्वचिंतनात आणि आत्मचिंतनात रममाण राहणाऱ्या महापुरुषाचेच जणू कवीने वर्णन केले आहे. अशा एका महापुरुषाच्या- विनोबांच्या निकट सान्निध्यात राहण्याचे भाग्य मला मिळाले आणि त्यांच्या वेदान्ताची अशी उंचीही पाहायला मिळाली.

संत तुकडोजी महाराज आणि विमलाजी
तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाला होता. ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते. एकदा मुंबईचे राज्यपाल त्यांच्या चौकशीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी विचारलं, ‘‘महाराज, काही शेवटची इच्छा?’’ महाराज म्हणाले, ‘‘होय, आमचं एक लेकरू आहे. नाव विमल ठकार. युरोपात कुठेतरी आहे आत्ता. भेट झाली असती तर बरं झालं असतं.’’ राज्यपालांनी ही गोष्ट नरेंद्र तिडके यांना सांगितली. त्यांनी वसुभाईंच्या मदतीने नॉर्वेला फोन लावला. विमलाजींना विमानाचं तिकीट पाठवून बोलावून घेतलं. विमानतळावर उतरून त्या बाहेर आल्या तर उंचेपुरे- खानदानी गृहस्थ पुढे उभे. ते होते बॅ. आप्पा पंत. त्यांनी विमानाच्या तिकिटाएवढी रक्कम विमलाजींच्या हाती ठेवली. विमलाजींनी विचारलं, ‘हे काय?’ आप्पा पंत म्हणाले, ‘‘ही रक्कम मी तुम्हाला द्यावी, असा अंबामातेचा आदेश आहे. तीन दिवस आणि तीन रात्री अंबामातेच्या पूजा-आरतीच्या वेळी मला हा आदेश मिळत होता.’ विमलाजी हॉस्पिटलमध्ये तुकडोजी महाराजांच्या पाशी पोचल्या. ‘‘कुणी भेटलं होतं?’’ त्यांनी विचारलं. ‘‘होय.’’ विमलाजी उत्तरल्या. ‘‘तिकिटाची व्यवस्था झाली?’’ प्रश्न. ‘‘होय.’’ एवढंच उत्तर. हा मिताक्षरी संवाद, विमानतळावरची ती घटना यांची संगती कशी लावायची? महाराज मृत्युशय्येवर असताना म्हणाले, ‘‘मी गेल्यावर सगळ्या कार्याचा विध्वंस होईल. विमल, तू लक्ष ठेव.’ विमलाजींनी विचारलं, ‘‘महाराज, मेल्यानंतरची चिंता करता? तुम्ही साधू आहात ना?’’ महाराजांनी डोळे मिटून घेतले. ‘‘बेटा, बरोबर बोललीस तू!’’ जाताना महाराजांनी हृदय हेलावणारी रचना केली.
डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे
पंढरीच्या पांडुरंगा, वेगेवेगे धाव रे
शिणली ही गात्रे, आता उडू पाहे प्राण रे
पंढरीच्या पांडुरंगा, वेगेवेगे धाव रे
आम्ही विमलजींसमवेत महाबळेश्वरला एका साधना-शिबिरात होतो. नुकतेच जे. कृष्णमूर्ती हे जग सोडून गेले होते. त्यांच्याबद्दल बोलताना ताई म्हणाल्या,'World has lost the only and lonely voice of sanity.' दहशतवाद, भ्रष्टाचार, जातीयता या सगळ्या वेडांनी पछाडलेल्या जगात सुज्ञतेचा तो एक आणि एकाकी आवाज आज जग हरवून बसलं आहे. ११ मार्च रोजी विमलाजींनी देह ठेवला त्यावेळी मला त्यांचे हे शब्द आठवले नि वाटलं की विमलाजींच्या रुपाने असाच एक एकाकी आवाज आपल्याला जागवीत होता. तो आता मूर्तरुपात दिसणार नाही! मी त्यांना प्रथम पाहिलं ते डॉ. फडणीस यांनी योजलेल्या महाबळेश्वरच्या पहिल्या साधना शिबिरात १९८७ मध्ये. झपझप चालणं, प्रसन्न हसणं, अपार्थिव स्वरात गाणं आणि प्रवचनाआधी थेट अंतरंगाचा वेध घेणाऱ्या नजरेने एकवार श्रोतृवृंदावर पकड घेणं आणि विवेचन पूर्ण होईपर्यंत क्षणभरही ती पकड ढिली न होणं, आंतरिक विश्वाचे नवे नवे आयाम उलगडत जाणं आणि श्रोत्यांना आपली ज्ञानदृष्टी उघडते आहे असा साक्षात अनुभव देणं. शुभ्रवसना ,आत्मदर्शिनी विमलाजींच्या व्यक्तिमत्वाचे हे विशेष.

गाफील ओबीसींना भवितव्य कसे असणार? निष्क्रिय ओबीसींना कृत्रिमरीत्या कुठवर जगवणार? स्वत:च्या हक्कासाठी न लढणारे नामशेष होतात हा जगाचा नियम आहे. डायनोसोर संपले तेथे ओबीसींचे काय? बोला, लढता की भेकडपणाने राजकीय मृत्यू स्वीकारता? फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुण्याईने मिळवलेले घालवण्याचा तुम्हाला अधिकार आहे काय? पोराबाळांच्या भवितव्यासाठी काहीतरी शिल्लक राहावे यासाठी झटणार की आमचे आईबाप मुर्दाड होते अशी पुढच्या पिढय़ांनी नोंद करावी म्हणून झोपा काढणार?अतिरेकी आणि भडकाऊ भाषणे करणाऱ्या अडगळीतील मॅट्रिक पास बुजगावण्यांच्या आधारे मराठा राज्यकर्ते महाराष्ट्राची मराठा विरुद्ध इतर अशी फाळणी करायला निघाले आहेत. ब्राह्मणेतर चळवळीत मराठय़ांना साथ देणाऱ्या इतर बहुजनांचा हा विश्वासघात आहे. ‘‘रोम नावाचे शहर जळत असताना ते विझविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी निरो नावाचा सद्गृहस्थ फिडेल वाजविण्यात गुंग होता,’’ अशी एक कथा शाळकरी वयात वाचली होती. तिची आठवण होण्याचे कारण म्हणजे राज्यातील ओबीसी आरक्षण संपविण्याचे कटकारस्थान मराठा राज्यकर्त्यांकडून चालू असताना पंचायत राज्यातील ओबीसी आरक्षणाचे ६४,००० निष्क्रिय लाभार्थी आज तिऱ्हाईतासारखे गप्प आहेत.

समाजाचे व्यवहार सुरळीत चालायचे असतील तर घटनेशी आणि सर्वसामान्यांकरिता मंजूर झालेल्या कायद्यातील तत्त्वांशी आणि त्यामागच्या मूलभूत विचारांशी शासनाची बांधीलकी हवी व त्यानुसार अंमलबजावणी व्हावी, अशी प.बा. सामंत यांची पक्की धारणा होती आणि त्याबाबत ते खूप आग्रही असत. या सर्व प्रक्रियेत कुठे अडसर निर्माण झालेले दिसले की ते दूर करण्यासाठी पपा सज्ज व्हायचे.. २६ फेब्रुवारीला दुपारी ४ च्या सुमारास पपांची प्राणज्योत मालवली. अगदी त्याच वेळी मुंबई उच्च न्यायालयात प. बा. सामंत व इतरांनी केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी झाली. न्यायमूर्तीनी आपला निर्णय राखून ठेवला. १९७५ साली विधिमंडळाने मंजूर केलेल्या कमाल नागरी जमीनधारणा कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत नव्हते. उलट, जवाहरलाल नेहरू योजनेतून राज्य सरकारला निधी पुरविण्यासाठी केंद्र सरकारने लादलेल्या अटींनुसार विधिमंडळाने हा कायदाच आता रद्द केला आहे. या निर्णयाविरुद्ध पपांनी रिट पिटीशनचं हत्यार उपसलं होतं.