Leading International Marathi News Daily
रविवार, २२ मार्च २००९
विविध

वाकडला अपघातामध्ये संगणक अभियंता ठार
पिंपरी, २१ मार्च / प्रतिनिधी

वाकड विनोदे वस्ती येथे आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास झालेल्या ट्रक व दुचाकीच्या अपघातामध्ये इन्फोसिस कंपनीचा संगणक अभियंता ठार झाला. धडक देऊन ट्रकचालक पसार झाला . रोहितकुमार जैन (वय २८, रा. १४, कानिफनाथ हौसिंग सोसायटी, पौड रोड, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. रोहितकुमार आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास त्याची मैत्रीण प्रियंका जैन (वय २५) हिच्या समवेत दुचाकीवर घरी निघाला होता. दरम्यान, विनोदे वस्ती वाकड येथे समोरून येणाऱ्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला आहे. यात रोहितकुमारचा जागीच मृत्यू झाला. तर प्रियंकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.