Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
व्यापार-उद्योग
(सविस्तर वृत्त)

व्यापार - संक्षिप्त
‘उत्तम गॅल्वा’ला सलग १२व्या वर्षी ‘ईईपीसी’कडून पुरस्कार
व्यापार प्रतिनिधी: भारतातील गॅल्वनाइज्ड स्टीलचे आघाडीचे उत्पादक- निर्यातदार ‘उत्तम गॅल्वा स्टील्स लिमिटेड’ने सातत्याने १२व्या वर्षी इंजिनीअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल (इइपीसी)चा

 

प्रतिष्ठित ‘एक्स्पोर्ट एक्सलन्स’ पुरस्कार पटकावला आहे. या वर्षांच्या शेवटी कंपनी चार लाख वीस हजार टन मूल्यवर्धीत स्टील निर्यातीपर्यंत जाऊन ठेपेल. पुढच्या आर्थिक वर्षांसाठी कंपनीचे अर्धा दशलक्ष टन निर्यातीचे ध्येय असेल. आर्थिक मंदीच्या काळातदेखील उत्पादन आणि भौगोलिक वैविध्यामुळे कंपनीचे मार्जिन त्यामानाने संरक्षित आहेत. उत्तम सध्या जगभरातील १४० देशांत आपली उत्पादने निर्यात करीत आहे.
स्टँडर्ड चार्टर्ड बँक ‘टाय’ची जागतिक प्रायोजक
व्यापार प्रतिनिधी: स्टँडर्ड चार्टर्ड प्रायव्हेट बँकेने ‘द इंडस आंत्रप्रिनर्स (टाय)’ या संघटनेस जागतिक पातळीवर प्रायोजित करण्याची घोषणा केली आहे. ‘द इंडस आंत्रप्रिनर्स’ ही ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर उद्योजकांसाठी सेवाभावी कार्य करणारी जगातील सर्वात मोठी संघटना आहे. १९९२ साली अमेरिकेतील मूळच्या दक्षिण आशियातील यशस्वी उद्योजकांनी एकत्रित येऊन ‘टाय’ संघटना स्थापन केली होती. या संघटनेचे जगातील १२ देशांत विविध चॅप्टरमध्ये एकूण १२००० सदस्य आहेत. नव्या उद्योजकांना मार्गदर्शन, शिक्षण व संपर्क साधून जागतिक पातळीवर उद्योजकतेला चालना देणे हे या संघटनेचे प्रमुख ध्येय आहे.
शेल ल्युब्रिकन्ट्सची सेवा श्रेणी
व्यापार प्रतिनिधी: फिनिश्ड ल्युबिक्रंट्स अर्थात यांत्रिक वंगणाच्या निर्मितीतील अग्रेसर कंपनी शेल ल्युब्रिकन्ट्सने भारतात ‘प्रॉडक्ट प्लस’ या नव्या सेवा श्रेणीचे अनावरण केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांना प्रभावी व अभिनव सेवा देण्याच्या हेतूने या वेब-आधारीत ‘शेल ल्यूबमॅच’ सेवा साधनाचेही त्यानिमित्ताने शेल इंडिया मार्केट्स प्रा. लि.च्या ल्युब्रिकन्ट्स विभागाचे प्रमुख डोनाल्ड अँडरसन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शेल प्रॉडक्ट प्लस श्रेणीमध्ये भारतातील बी २ सी आणि बी २ बी या दोन्ही प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकांगी सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात शेल ल्यूबअ‍ॅनालिस्ट, शेल ल्यूबक्लिनिक, शेल ल्यूबव्हिडीओ चेक, शेल ल्यूबअ‍ॅडव्हायजर, शेल ल्यूबप्लॅनर आणि शेलल्यूबकोच यांचा समावेश असून, त्यात आलात शेल ल्यूबमॅचची भर पडली आहे, असे अँडरसन यांनी स्पष्ट केले.
गोदरेज प्रॉपर्टीजला ‘पुरस्कार
व्यापार प्रतिनिधी: स्थावर मालमत्ता क्षेत्राला वाहिलेल्या ‘अकॉमोडेशन टाइम्स’ या प्रतिष्ठित नियतकालिकाच्या २३ वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीला ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’मधील सर्वोत्तमतेसाठी पुरस्कार बहाल करण्यात आला. वरळीच्या नेहरू सेंटर सभागृहात झालेल्या या शानदार पुरस्कार सोहळ्याला रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींसह, मुंबईचे पालिका आयुक्त जयराज फाटक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’चे अध्यक्ष होरमसजी एन. कामा यांच्या हस्ते हा पुरस्कार गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद कोरडे यांनी स्वीकारला.
‘मेडोइंडिया’ची अंधेरीत गोदाम सुविधा
व्यापार प्रतिनिधी: जापनीज खाद्यपदार्थाचे विपणन करण्यात आघाडीवर असलेल्या मेडोइंडिया (मेडो एन्टरप्राइज प्रा. लि.) ने मुंबईतील अंधेरी येथे अशा प्रकारची पहिलीच वेअरहाऊस आणि सेवा देणारी उत्पादनक्षमता तयार केली आहे. मेडोइंडियाचे संचालक हॅरी चेंग यांच्या म्हणण्यानुसार ‘‘या अद्ययावत उत्पादनक्षमतेमुळे भारतातील जपानी खाद्यपदार्थाच्या बाजारपेठेला लोकप्रियता तसेच बाजारपेठेतील उलाढाल दोन्हींबाबत चांगली चालना मिळेल.’ तापमान नियंत्रित केलेल्या स्वच्छ उत्पादनक्षमतेत २५० हून अधिक सुक्या वस्तू आणि ३० महत्त्वपूर्ण ओल्या वस्तू (डीप फ्रीज) साठवता येतील. मुंबईत कंपनीची ५० हून अधिक इन्स्टिटय़ूशनल आणि रिटेल आऊटलेट्स आहेत आणि दिल्ली, गुरगाव, गोवा आणि बंगलोरमध्ये मोठय़ा प्रमाणावर त्यात वाढ होत चालली आहे.
संतूरचा नवीन ‘सॉफ्ट हॅण्ड’
व्यापार प्रतिनिधी: ‘संतूर’तर्फे नुकताच त्यांचा ‘सॉफ्ट हॅण्ड’ हा लिक्विड हॅण्ड वॉश नवीन फॉम्र्युल्यासह बाजारात पुन्हा सादर करण्यात आला आहे. या नवीन हॅण्ड वॉशमध्ये किटाणूंना मारण्याच्या क्षमतेबरोबरच हाताची कोमलता जपण्याचे गुणधर्मदेखील आहेत. कंपनीने या हॅण्ड वॉशच्या सादरीकरणासाठी ‘हॅलो, सॉफ्ट हॅण्ड बाय बाय जम्र्स’ ही मोहीम राबविली होती. या मोहिमेंतर्गत आपले हात किटाणूंपासून मुक्त ठेवण्यासाठी हातांची नैसर्गिक कोमलता गमवावी लागते या चुकीच्या समजुतीबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली आहे. ‘संतूर’चा हा नवीन हॅण्ड वॉश इसेन्शियल ऑईल आणि एक्स्ट्रा मॉईश्चरायझिंग या दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.