Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

शो.. १५ हजार कोटींचा
भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे रोजगाराचा प्रश्न भेडसावू लागला आहे. भारतातील बेरोजगारांची संख्या लाखोंच्या घरात गेली असतानाच सध्या नवडणुकीच्या निमित्ताने काही प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहेत. आर्थिक मंदीच्या काळातही निवडणुकीच्या निमित्ताने व्यापारी व बेरोजगारांना सध्या चांगले दिवस आले आहेत. आर्थिक मंदीचा परिणाम या निवडणुकीवर झालेला दिसत नाहीये.

दिल से..
प्रिय मिहीर,

हाय! माझी परीक्षा संपली..!! यिप्पी!!
इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू. एकदम मोकळं वाटतंय. यावेळी एकूणच परीक्षेचा अनुभव खूप बोअरिंग होता रे. खरं तर, मला परीक्षांचा माहौल खूप आवडतो. एक वेगळीच एनर्जी असते. या वेळी आजूबाजूला. पण या वेळी मला काय झालं होतं कुणास ठाऊक. हातात पुस्तक घेऊच नये, असं वाटत होतं. तरी बरं सगळे विषय ‘अभ्यास’ म्हणून मला खूप आवडणारे होते, पण इच्छाच नव्हती होत अभ्यास करायची. म्हणजे भर दुपारचं रणरणतं ऊन आहे, आपण कुठे एक घोट पाणी मिळतंय का ते शोधत वणवण फिरतोय आणि अचानक आपल्या डोक्यावर कोणीतरी खूप जड ओझं आणून ठेवलं आणि आपल्याला सांगितलं,

एस.व्ही.टी. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे सर विठ्ठलदास ठाकरसी कॉलेज ऑफ होम सायन्स २००८-०९ हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहे. पन्नासाव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या या महाविद्यालयाच्या विकासाचा पट अतिशय उल्लेखनीय राहिला आहे. महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने गेले वर्षभर अनेक उपक्रम साजरे केले गेले. या सुवर्ण महोत्सवाचा सांगता समारंभ २२ मार्च रोजी दीनानाथ मंगेशकर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख या उपस्थित होत्या. त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठ व एस.व्ही.टी. महाविद्यालय यांचा इतिहास गौरवशाली असल्याचे सांगत विद्यार्थिनींना व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे विशेष प्रमुख पाहुणे म्हणून एन.एम.आय.एम.एस. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. माधव वेलिंग उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व आपल्या भाषणात सांगितले.याप्रसंगी गेल्या पन्नास वर्षांतील प्रगतीचा आढावा घेणाऱ्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या प्रा. विप्रा बॅनर्जी यांनी महाविद्यालयाचे उपक्रम व सुवर्णमहोत्सवी वर्षांविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, १२ ऑगस्ट ०८ पासून सुरू झालेल्या सुवर्ण महोत्सवाची सांगता या कार्यक्रमाने होत आहे. महिला सशक्तीकरण हे या महाविद्यालयाचे ध्येय आहे. त्याच दृष्टीने येथील अभ्यासक्रम चालवला जात असल्याची माहिती बॅनर्जी यांनी दिली.
निवेदिता सावंतसाहित्यवेध २००९
‘ज्ञानमार्गी समाजाच्या निर्मितीसाठी साहित्यातील वैचारिकता अत्यंत आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन डॉ. अरुण टिकेकर यांनी अलिकडेच येथे केले. मुंबई विद्यापीठातर्फे राबविल्या जाणाऱ्या साहित्यवेध या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात साहित्यवेध ०९ हा उपक्रम अलिकडेच पार पडला. साहित्य आणि वैचारिकता हे यंदाच्या साहित्यवेधचे सूत्र होते. अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. साहित्यवेधची पहिली संध्याकाळ रंगली ती ‘वेध कवितांचा’ या कार्यक्रमाने. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक कवींचा त्यात सहभाग होता. कवयित्री नीरजा, उषाकिरण आत्राम, अशोक बागवे, वीरधवल परब असे अनेक कवी त्यात सहभागी होते. कवी वाहरू सोनावणे यांनी ‘स्टेज’ या कवितेतून तळागाळातील लोकांचे दु:ख मांडले आणि उपस्थितांची मने हेलावून सोडली. या कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन अरुण म्हात्रे यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले. अतिशय प्रवाही रितीने कवितांवर भाष्य करत त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. दुसऱ्या दिवशी एकूण चार चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. साहित्याअंतर्गत असणारे विविध प्रवाह आणि त्यातील वैचारिकता असा विचार या चर्चासत्रात मांडला गेला. यात ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी आणि दलित असे विविध प्रकार अंतर्भूत केले गेले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. निशिकांत मिरजकर यांचे बीजभाषण झाले. त्यांनी चर्चासत्रांत अपेक्षित विषयांचा तुलनात्मक आढावा घेतला. साहित्यवेधच्या समारोप सत्रात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले उपस्थित होते. त्यांनी विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या मराठीकरणाविषयी माहिती दिली. यात विद्यापीठाच्या मराठी विभागाचा सहभाग उल्लेखनीय असल्याचे त्यांनी म्हटले. साहित्यवेध हा उपक्रम कुलगुरूंच्या प्रेरणेने व प्रोत्साहनानेच डॉ. वसंत पाटणकर यांनी दिली. ‘साहित्यवेध ०९’ च्या समन्वयक म्हणून प्रा. पुष्पा राजापुरे-तापस यांनी काम पाहिले. प्रतिनिधी

‘फ्यूजन २००९’
वसंतदादा पाटील प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘फ्यूजन २००९’ हा १४ वा वार्षिक महोत्सव १९ ते २१ मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने आयोजिण्यात आलेल्या विविध उपक्रमात मोठय़ा संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. गायन, अंताक्षरी या नेहमीच्या स्पर्धाच्या जोडीने ‘इन्फॉर्मल्स’ हा आगळावेगळा इव्हेंट आयोजिण्यात आला होता. ‘व्हिज्युअल इम्पॅक्ट’ या नृत्य स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे वैशिष्टय़ असणारा फॅशन शो रंगतदार होता. बीच वॉलीबॉल, बॉक्स क्रिकेटबरोबर रायफल शूटिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंगसारख्या अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस्चाही त्यात समावेश होता. तसेच तांत्रिक विभागातर्फे फोटोशॉप, कॉम्प्युटर असेंब्लिंगची कार्यशाळा घेण्यात आली. फीफा ०७, काउंटर स्ट्राईक, (ठरा) एन. एफ. एफ. २ अंडर ग्राऊंडसारख्या लॅन गेमिंग स्पर्धा या वेळी झाल्या. रोबोटिक्स स्पर्धेत, स्पर्धकांनी तयार केलेले वेगवेगळे रोबोटस डिझाईन्स पहावयास मिळाले. ‘रॉक शो’ या इव्हेंटच्या पहिल्याच वर्षी, अठ्ठावीस बॅन्डस्ने ‘रॉक ऑन’ परफॉर्मन्सेस दिले. एकूणच ‘फ्यूजन-२००९’ इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांना ‘रिफ्रेशिंग’ ठरला!
कॅम्पस मूड टीम