Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बनावट नोटांप्रकरणी तिघांना अटक; पोलीस कोठडी
मानवत, २३ मार्च/वार्ताहर

 

तालुक्यातील करंजी येथील एक हजार रुपयाच्या नोटांच्या जळालेल्या झेरॉक्स आढळल्या होत्या. याचा तपास करून पोलिसांनी तिघांना अटक केली.
मुख्य आरोपी दशरथ सखाराम कांबळे (वय २३), अनंता राघोजी कांबळे (वय २२, दोघेही राहणार करंजी) व अशोक उत्तम कलाल (वय ४९, वालूर, तालुका सेलू) यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे. त्यांना १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी गुन्हा कबूल करून ३० जानेवारीला कल्याण येथून ‘कलर प्रिन्टर’ व मुंबईच्या छत्रपती टर्मिनस येथून झेरॉक्सचा कागद खरेदी केला. वालूरला अशोक कलाल याच्या घरी ३१ जानेवारीला हे साहित्य ठेवण्यात आले. घटनेच्या दिवसापर्यंत म्हणजे ८ मार्चपर्यंत त्यांनी १००० रुपयाच्या बनावट नोटा छापण्याचा प्रयत्न केला; परंतु चलनी नोटा छपाईच्या तांत्रिक बाबी पूर्ण होऊ न शकल्याने तिघांनी कलर प्रिन्टर व कोरे कागद यांचा पुरावा नष्ट करण्यासाठी करंजी येथील खाणीमध्ये जाळून टाकले.
पोलीस निरीक्षक हरिदास मुंढे यांनी गुन्ह्य़ातील वापरण्यात आलेले साहित्य, मुख्य आरोपी दशरथ कांबळेच्या घरातून कोरे कागद, लेदर बॅग, नोंद वही, दुचाकी जप्त केली.
या गुन्ह्य़ात मानवत व सेलू तालुक्यांतील आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यता आहे.