Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

कोकणातील अपारंपरिक ऊर्जेचा आशावाद : कोकण कृषी विद्यापीठाचे एनर्जी पार्क

 

मानवी जीवन शैलीत सुधारणा करायची असेल तर,ऊर्जा ही एक महत्त्वाचा घटक आह़े त्यामुळेच औद्योगिक व घरगुती क्षेत्रात ऊर्जेला महत्त्वाचे स्थान आह़े अशा परिरिस्थतीत पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा ऱ्हास होत आह़े पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांना पुरक स्त्रोत म्हणून सोलर, कृषी अवशेष व हायड्रोइलेक्ट्रिक स्त्रोतांचा उपयोग करणे योग्य ठरेल़ हे स्त्रोत कोकणात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत़ अपारंपारिक स्त्रोतांचा उपयोग केला गेला तर पर्यावरणावर होणारे प्रदूषण टाळता येईल़ सगळ्या जगाचे लक्ष आज जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा उपयोग करून कधी न संपुष्टात येणारी व पारंपरिक ऊर्जेस पूरक अशी ऊर्जा कशा प्रकारे निर्माण करता येईल याकडे आह़े या पाश्र्वभूमीवर डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील एनर्जी पार्क एक महत्वपूर्ण भूमिका बजावीत आहे.
कोकण प्रदेश बहुतांशी डोंगराळ, समुद्र पर्वताच्या रांगा व दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र असल्याने कृषी उत्पन्नाकरिता फारच थोडी व सपाट जमीन उपलब्ध आह़े कोकणातील ३० टक्के ऊर्जेची निकड कृषी अवशेष व जनावरांचे शेण इत्यादी पारंपरिक स्त्रोतांपासून भागवण्यात येत़े कोकण हा दुर्गम प्रदेश असल्यामुळे जवळपास ६५ टक्के जनतेस आधुनिक सुविधांपासून वंचित राहावे लागत़े ही सर्व जनसंख्या कृषी अवशेष, जनावरांचे शेण व केरोसीन यांवर अन्न शिजवणे, दिवाबत्ती व उजेडाकरिता अवलंबून आह़े त्यामुळे अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांपासून ऊर्जेची निर्मिती करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे विद्यापिठाच्या कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा.वा.पी.खंडेतोड, डॉ.एस.एस.सेंगर आणि डॉ.ए.जी.पोवार यांनी संशोधनाअंती निष्पन्न झाल्याने या एनर्जी पार्कची निर्मिती येथे करण्यात आली आहे.
सुर्याची ऊर्जा अर्थात सौर ऊर्जा भारतासारख्या विषुवृत्तीय प्रदेशांमध्ये अमर्याद प्रमाणात उपलब्ध आह़े परंतु या उर्जेला प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञाची किंमत जास्त आह़े हे तंत्रज्ञान अत्यंत अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्याकरीता एनर्जी पार्क मध्ये संशोधन करण्यात येत असून काही उपकरणे त्यायोगे उपलब्ध करुनही देण्यात आली आहेत. सौर ऊर्जेवर आधारित अथवा कमी, जादा तापमानावर काम करणारी उपकरणे तसेच उष्णतेद्वारे किंवा फोटो व्हाल्टाइकद्वारे विकेंद्रीत स्वरूपामध्ये ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी विविध उपकरणे आज उपलब्ध आहेत़ यामध्ये मुख्यत्वे सौरपट्टी, चुल (कुकर्स), उष्ण जल संयंत्र, वाळवणी यंत्र, पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप, धान्य व बी यावर उष्णतेची क्रिया करण्यासाठी, शुध्द जल निर्मितीकरिता वातालुकूल व शीतगृहाकरिता, भट्टय़ांकरिता, विद्युत निर्मितीकरिता, उष्णसंयंत्र किंवा फोटो व्होल्टाईक फलकाचा वापर तसेच व धुरळणी करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर तसेच फवारणी व धुरळणी करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येतो़
कोकणास सौर ऊर्जेचे वरदान लाभलेले असून, त्याची उपलब्धता साधारण: ४५०-६०० व्ॉट प्रति वर्ग मीटर, ७-८ तास प्रतिदिन व किमान २५० दिवस प्रतिवर्ष इतकी आह़े त्यामुळे जवळपास १५-२० मेगॅज्यूल प्रति चौ़ मीटर प्रतिदिन इतकी ऊर्जेची निर्मिती करणे शक्य आह़े सौर ऊर्जेचा वापर करून पदार्थ वाळवणे हा सवरेत्कृष्ट व स्वस्त पर्याय उपलब्ध आह़े अशा प्रकारे प्रक्रिया केलेले नाविन्यपूर्ण कल्पनेवर आधारित पदार्थ जादा भावाने सौर प्रक्रिया पदार्थ म्हणून बाजारात विश्वसनीय दुकानांच्या साखळीमार्फत विक्री करणे शक्य आह़े अशाप्रकारे प्रक्रिया केलेल्या पदार्थाना लागणारे मनुष्यबळ रोजगार निर्मितीकरीता निश्चित स्वरूपात हातभार लावेल़ त्याचप्रमाणे अशा प्रक्रियांचा उपयोग करून मत्स्य व्यावसायिक व शेतकरी वर्गाचे पदार्थाचे नाशिवंत म्हणून होणारे नुकसान टाळता असा दावा संशोधकांचा आह़े
सौर ऊर्जेचा वापर करून औषधी वनस्पतीपासून औषध निर्मिती, मसाल्याचे पदार्थ, फळांपासून बनविण्यात येणारे पदार्थ (उदा. आंबापोळी, भुकटय़ा इत्यादीं) निर्मिती त्या पदार्थाचे गुणधर्म व त्यास आवश्यक योग्य ते तापमान ठरवून करणे शक्य आह़े तसेच पदार्थाची प्रत, रंग इत्यादी टिकवून पदार्थावर प्रक्रिया करणे शक्य असल्याचे संशोधन यशस्वी झाले आहे. कोकणातील प्रसिध्द आमरस प्रक्रिया व बाटली बंद आमरस या उद्योगमध्ये आमरस गरम करणाकरिता ‘शेफलर सौर कुकरचा’ (पॅराबोलिक कॉन्सेंट्रीक कुकर) चा उपयोग काही प्रमाणात आता करण्यात येत आहे. हा कुकर वाफेची निर्मिती करण्याकरीतां वापरता येत असल्याने, वाफेंद्वारे रस शिजवणे, काजू प्रक्रिया ब्लिचिंग करणे, र्निजतुकीकरण इत्यादी प्रक्रिया करता येतात़ याच कुकरच्या सहाय्याने काजू भाजणे देखील शक्य आह़े तसेच ऊध्र्वपातन पद्धतीने फेणी बनविण्याकरिता या कुकरचा वापर शक्य आह़े सौर उष्ण जल संयंत्राचा वापर उष्ण जलनिर्मितीकरिता करता येईल़ उष्ण जलाचा वापर प्रक्रिया करताना धुण्यासाठी, ब्लिचिंगसाठी किंवा बाष्प निर्मितीसाठी, पाणी गरम करण्यासाठी वापरता येईल़ तसेच लोणची
बनविणारे, भुकटी बनविणारे उद्योग, पापड बनविणारे कुटी उद्योग, सौर ऊर्जेचा वापर करून प्रक्रिया, तसेच वाफविण्यासाठी करून पदार्थाचे आयुर्मान
वाढविता येईल़ (पूर्वार्ध)