Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

बस नाम ही काफी है ?
अभिजीत कुलकर्णी

लोकसभा निवडणुकीचे हाकारे-पिटारे तर केव्हाच सुरू झाले आहेत. उमेदवार निश्चितीनंतर आता खऱ्या अर्थाने लढाईला तोंड फुटले आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत घडणाऱ्या वेगवान घडामोडींमुळे राजकीय समीकरणे वेगवेगळी वळणे घेणार असली तरी प्रत्येक उमेदवाराशी निगडीत काही मुळातले मुद्दे जय-पराजयाला बऱ्याच अंशी कारणीभूत ठरणार आहेत. त्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख उमेदवारांना तारक अथवा मारक ठरू शकणाऱ्या बाबींचा परामर्श..
आपल्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापून राष्ट्रवादीने नाशिकमधून समीर भुजबळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने ही लढत लक्षवेधी ठरणार यात शंका नाही.

पाह्य़चं अन् चर्चा करत राह्य़चं !
भाऊसाहेब :
ठरले म्हनायचे येकदाचे समद्ये उमेदवार, भावराव..
भाऊराव : हो, बरेच दिवस चाललेल्या ताणाताणीनंतर अखेर एकदाची तिकीटाची सोडत निघाली बघा.
भाऊसाहेब : मंग काय म्हन्त्यात लोक ?
भाऊराव : ते माझ्यापेक्षा भावडय़ा चांगलं सांगू शकेल, भटकत असतो गावभर सारखा..
भावडय़ा : तिकीटाचा मटका फुटला, आता नजर आकडय़ावर.
भाऊराव : आधी मटका मग आकडा असं कसं ?
भावडय़ा : निवडणुकीचं सगळं गणित उलट-पालटचं असतं ना !
भाऊसाहेब : म्हंजे ?

कालसुसंगत दृष्टी असावी
नाशिकचा प्रवास मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे झाल्यानंतर आता तो तंत्रभूमीच्या दिशेने सुरू झाल्याचे पहावयास मिळते. अशा परिस्थितीत निवडून येणारा प्रतिनिधी हा Visionary असणे अत्यंत गरजेचे आहे. आज तंत्रज्ञानामुळे कुशल तरूणांना मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. ही संधी आपल्या शहरातील, मतदारसंघातील तरूणांना कशी उपलब्ध करून देता येईल, यासाठी लोकप्रतिनिधीला तंत्रज्ञानासारख्या विषयाचा आवाका असणे निकडीचे आहे.

वाहतुकीचा चक्रव्यूह ‘जैसे थे!’
प्रश्न जिव्हाळ्याचे

प्रतिनिधी / नाशिक

अवघ्या लाखभर रूपयात मिळू शकणाऱ्या नॅनोमुळे चारचाकी मोटारीची अपेक्षा बाळगणाऱ्यांची इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग प्रशस्त झाला असला तरी नाशिक शहरातील रस्ते व कोलमडलेली वाहतुकीची समस्या या इच्छापूर्तीसाठी त्यांना कितपत साथ देईल हे सांगणे अवघड आहे. कारण, आजमितीस शहरामध्ये वाहनांची जेवढी एकूण संख्या आहे, त्यांनाही नियोजनाअभावी सामावून घेणे जिकिरीचे ठरल्याचे दिसत आहे. पार्कीगचा अभाव, अतिक्रमणधारकांनी व्यापलेले रस्ते व चौक, गॅरेजधारकांनी सव्‍‌र्हीस रोडवर केलेला कब्जा, रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा असे अनेक घटक त्यास कारणीभूत आहेत.

धुळे मतदारसंघासाठी जनता दलाचे निरीक्षक जाहीर
नाशिक / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येथे आयोजित जनता दल सेक्युलरच्या जिल्हास्तरीय बैठकीत प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी पक्ष निरीक्षकांची नेमणूक केली. येथील दुर्गा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्ह्य़ातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत धुळे लोकसभा मतदार संघातील उमेदवार निहाल अहमद यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. जनता दल हा सर्वात जुना पक्ष असून स्वातंत्र्य लढय़ापासून या पक्षाने कार्य केले आहे. इतर राजकीय पक्षांप्रमाणे राजकारण करण्यापेक्षा समाजसेवा या पक्षाच्या माध्यमातून केली जात असल्याचे मत पक्षाचे प्रदेश संघटन सचिव मोहन खामकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा सचिव योगेश तायडे, एकनाथ येवले, गिरीश मोहिते आदिंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मुख्य निरीक्षक म्हणून वसंत शिराळी, मालेगाव पूर्व मतदार संघात जिल्हा परिषद सदस्य मधुकर हिरे, मालेगाव पश्चिममध्ये जनता दलाचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, बागलाण विधानसभा मतदारसंघात एकनाथ येवले, धुळे विधानसभा मतदार संघात धुळे शहराध्यक्ष धैर्यशील पाटील, धुळे मध्य मतदार संघात मोहन खामकर, शिंदखेडा विधानसभा मतदार संघात अशोक कदम व सुनील तायडे, युवा जनता दल निरीक्षक कैलास राऊत व मनोज पिंपळसे यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडणुकीसाठी आपल्या मतदार संघात कार्यकर्त्यांच्या मदतीने पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले.

औद्योगिक खंडित वीजपुरवठय़ामुळे उद्योजक हैराण
नाशिक / प्रतिनिधी

सातपूर औद्योगिक वसाहतीत सलग दोन दिवस विद्यूत पुरवठा खंडित झाल्याने उद्योजकात तीव्र संताप व्यक्त करण्या्त येत आहे. महावितरणाने खंडित वीज पुरवठय़ावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, यासाठी १३२ कोटींचा इन्फ्रा प्रोजेक्ट राबवावा, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
सातपूरच्या औद्योगिक भागात आजही २८ ते ३० वर्षांपूर्वीचे जुने रोहित्र असून डीपी बॉक्स, फिडरही जुने झाल्याचे गाऱ्हाणे महावितरणचे उपअभियंता रोहनकर यांच्या समोर मांडण्यात आले. मार्च एण्ड व आर्थिक मंदीमुळे उद्योजक हैराण झालेले असताना विद्युत वितरण कंपनीकडून खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे लाखाचे नुकसान सहन करावे लागत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. शनिवारचे साप्ताहिक भारनियमन असताना रविवारी, सोमवारी देखील वीज पुरवठय़ा अभावी उत्पादन बंद ठेवून कामावर आलेल्या कामगारांना बसून वेतन द्यावे लागणार असल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अशोक टेहरे यांना वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठीचे निवेदन निमा अध्यक्ष रमेश वैश्य, मानद सरचिटणीस धनंजय बेळे, उपाध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, नरेंद्र हिरावत, खजिनदार संजीव नारंग, आदींनी दिले.

वैशाली बोंबले मृत्यूची चौकशी करण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथील वैशाली साहेबराव बोंबले हिच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात यावी असे निवेदन दिंडोरीच्या पोलीस ठाण्यात जानोरी, नाशिकरोड, दिंडोरी, आडगांव, सय्यद पिंप्री येथील ग्रामस्थांनी दिले आहे. उपनिरीक्षक व्ही. एस. मोहकर यांनी या प्रकरणी योग्य तपास करण्यात येईल व दोषींविरूध्द कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. वैशालीचा विवाह मे २००५ मध्ये आडगाव येथे साहेबराव बोंबले यांच्याशी झाला. लग्नामध्ये टीव्ही, फ्रिज न दिल्यामुळे वैशालीचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ होऊ लागला. या त्रासाला कंटाळून तिने आपल्या दोन चिमुकल्यांसह १३ मार्च रोजी वलखेड येथील स्वतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सासु, सासरा, जाऊ, दिर आणि पती यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला. वैशालीचे सासरे दशरथ बोंबले हे गुन्हेगारी वृत्तीचे असून त्यांच्या त्रासामुळेच थोरल्या सुनेला घटस्फोट घेणे भाग पडले असेही निवेदनात म्हटले आहे. वैशालीला न्याय मिळण्यासाठी सर्व संशयितांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. योग्य कारवाई न झाल्यास आपले संपूर्ण कुटूंब पोलीस ठाण्याच्या आवारात आत्मदहन करेल, असा इशाराही वैशालीच्या कुटुंबियांनी दिला आहे.