Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
विशेष

घरात एखादी तसबीर असावी, एखादं पेंटिंग असावं किंवा एखादा तरी ‘फ्लॉवरपॉट’ असावा, असं आपल्यापैकी किती जणांना वाटतं? ‘फ्लॉवरपॉट’मध्ये ठेवायला फुले आणण्याची फार कटकट होते आणि त्यामुळे तो असला काय किंवा नसला काय, घरात त्याने शोभा वाढते किंवा आपल्याला फार बरं वाटतं, असं काही कुणाला वाटत असेल, असं वाटत तरी नाही. घरातल्या एखाद्या मंगलकार्यात कुणी भेट म्हणून दिल्या तरच असल्या वस्तू आपल्या घरात येणार. दुकानात जाऊन त्या खरेदी करण्याची आपली मनोवृत्ती नसते.

रायगडमधून अखेर सहाव्यांदा बॅ़ ए.आर. अंतुलेच!
१९५२ मध्ये रायगडचे (तत्कालीन कुलाबा जिल्हा) पहिले खासदार म्हणून काँग्रेसचे उमेदवार सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांना रायगडच्या मतदारांनी दिल्लीत पाठविले आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर चिंतामणरावांनी यांनी दिल्ली काबीज करून रायगडचे नाव दिल्लीश्वरांच्या पटलावर कायमचे कोरल़े या मतदारसंघात निवडणुकांच्या निमित्ताने होणाऱ्या उघड आणि छुप्या आघाडय़ा आणि युत्या यामुळे महाराष्ट्रातील एक वैशिष्टय़पूर्ण लोकसभा मतदार संघ असा नावलौकिक रायगडने आपल्या नावावर जमा केला आह़े आणि हाच आगळा नावलौकिक पंधराव्या लोकसभा निवडणुकीत रायगड पुन्हा एकदा सिद्ध करील, अशी परिस्थिती निर्माण झाली आह़े

य बाबल्या, महाबळेश्वराक गेललय की नाय?’’
‘‘कित्याक हो?’’
‘‘अरे मेल्या असा काय- साहित्य संमेलनाक गेललय की नाय’’
‘‘तात्यानू, माका काय आवड नाय.’
‘‘कसली आवड नाय, साहित्याची?’’
‘‘साहित्याची आवड आसा. पण मध्यमवर्गीय साहित्यिकांच्या भांडणात माका काय रस नाय? ह्य़ेंच्या भांडणाचो शो आमी कित्याक बघुचो?’’
‘‘ह्य़ा तुझा म्हणणा खराच आसा. पण त्या यादवाचा चुकल्यानी. असा लिवचाच कित्याक. आणि आमच्या वारकऱ्यांनी एवढा ताणुची काय गरज होती?’’
‘‘प्रत्येकान आपली चूक मानून दोन पावला मागे आयले असते तर हे निसते वाद झाले नसते.’’
‘‘पण तात्यानू, वाद झालो म्हणून बरा झाला. चॅनलवाल्यांक आणि पेपरवाल्यांक चघळूक एक विषय मॅळलो.’’
‘‘मेल्या, तुका काळजी त्या चॅनलवाल्यांची. साहित्य संमेलनाची काळजीच नाय.’’
‘‘मी काळजी करून हे साहित्यिक काय भांडूचे थांबतले. पण तात्यानु माझ्या डोसक्यात एक नेमी ईचार येता. अजून पंचवीस वर्षांन अशी साहित्य संमेलना भरतीत काय हो? कारण आमची पुढची पिढी सगळी यस-फस करणारी आसा. अजून काही वर्षांन मराठी बोलीभाषाच रवात.’’
‘‘असा काय नाय. साहित्य संमेलना दरवर्षी भरतली. दर वर्षांक नवनवीन त्यात वाद रंगून साहित्य संमेलनाचो व्याप वाढतलो.
‘‘पण माका असा नेहमीच वाटता- साहित्य संमेलनात तरी वाद होव नये. तो काय राजकारणाचो आखाडो नाय.’’
‘‘पुढचा संमेलनात कसलोच वाद होव नये यासाठी आपण प्रयत्न करया. यासाठी ज्या गावात संमेलन भरात तिकडच्या एखाद्या दादाक संमेलनाचा स्वागताध्यक्षपद दिवचा. म्हणजे कसलोच गोंधळ जावचो नाय याची हमी तो घेयत. थोडक्यात त्या तीन दिवसांच्या सिक्युरिटीची जबाबदारी तेचेर. त्याबदल्यात त्याका स्वागताध्यक्षपद दिवची हमी.’’
‘‘आणिअध्यक्षाचा निवडीचा काय करशात?’’
‘‘अध्यक्षाच्या निवडीसाठी एक रितसर जाहिरात दिवची. यात कोणत्याही समाजाक वा कोणाच्योय भावना दुखावल्यो न जातीत अशा लिखाणकरणाऱ्यांनीच अर्ज करूचे, अशी अट घालूक होयी. या अर्जाची छाननी करून संमेलनाध्यक्ष निवडूचो. म्हणजे कसलोच वाद होवचो नाय.’’
‘‘पण कसलाच वादाचा लिखान न करणाऱ्या लेखकाचा लिखाण म्हणजे पुचाट म्हणजे आमच्या मालवणी भाषेत बोलूचा तर अळणी असतला. म्हणजे त्यात काय मजाच नाय.’’
‘‘पण हे वाद होण्यापेक्षा अळणी लिखाण बरा. एकदा एक वर्षी ही प्रथा सुरू झाली की मग कसलोच वाद होवचो असा लिखाण न करणाऱ्यांची एक पिढी तयार जायत आणि मग संमेलनाचो अध्यक्ष निवडताना पुन्हा स्पर्धा सुरू जायत. नायतर सरकारी पत्रका लिवतत त्यांका संमेलनाचो अध्यक्ष करुचो. म्हणजे कसलोच वाद नाय जावचो.’’
‘‘म्हणजे बंडखोर, दलित, कामगार साहित्य संमेलनाच्या जोडीक आता कसलेच वाद नसलेला साहित्य संमेलन. म्हणजे आणखी एका संमेलनाची भर.’’
‘‘तात्यानू, तुमी आणखी यात वाद वाढव नकात. जाहिरात काढण्याची ही कल्पना साहित्य महामंडळाक सूचना. बघा तुमचा कसा ‘कौतिक’ जायत ता!’’
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com.