Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
व्यापार-उद्योग

इमर्सनचे पुण्यात डिझाईन आणि इंजिनीअिरग केंद्र
व्यापार प्रतिनिधी: अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील इमर्सन या आघाडीच्या कंपनीने िहजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथे नवे इंजिनिअिरग डिझाईन सेंटर उभारले आहे. पुण्याचे इमर्सन डिझाईन इंजिनिअिरग सेंटर कंपनीच्या जगभरातील विविध विभागांसाठी प्रॉडक्ट आणि सॉफ्टवेअर डिझाईन आणि इंजिनिअिरग सेवा उपलब्ध करून देईल. संपूर्ण कंपनीच्या पातळीवर इंजिनिअिरग सेवा पुरवणारे हे पहिलेच केंद्र आहे आणि आता ते जगातील अशा केंद्रांमध्ये सर्वात मोठे ठरले आहे. २००३ या वर्षी इमर्सनने हे केंद्र फक्त १३ कर्मचारी घेऊन सुरू केले आहे. आज या केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या ५०० असून इमर्सनच्या सर्व व्यावसायिक विभागांसाठी विस्तृत प्रमाणात इंजिनिअिरग सेवा येथून पुरविल्या जातात.

व्यापार संक्षिप्त
यस बँकेच्या देशांतर्गत हायब्रीड टियर-१ भांडवल उभारणीला उत्तम प्रतिसाद

व्यापार प्रतिनिधी:
यस बँकेने खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून रु, १५४ कोटी भांडवल उभे केल्याची घोषणा केली आहे. बँकेने जमा केलेले हे भांडवल ‘परपेच्युअल टियर-१’ भांडवल असून ते प्रॉमिसरी नोट स्वरूपात अनसिक्युअर्ड, अपरिवर्तनीय सबऑíडनेटेड बाँड म्हणजेच अपरिवर्तनीय कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. या कर्जरोखे विक्रीला आयसीआरए पतनिर्धारण संस्थेने ‘एलए प्लस’ व सीएआरए संस्थेने ‘ए प्लस’ पतनिर्धारण (क्रेडिट रेटिंग) दिले आहे. एखाद्या खासगी भारतीय बँकेने भारतीय स्थानिक बाजारपेठेत २००८-०९ वित्तीय वर्षांत ‘फर्स्ट टियर-१’ प्रकारचा केलेला हा पहिलाच कर्जरोखे व्यवहार आहे. येस बँकेने वित्तीय वर्षांत हायब्रीड टीयर-१, अप्पर टियर-२ यांच्या माध्यमातून १७५ कोटी, तसेच अप्पर टियर-२ माध्यमातून ५४३ कोटी अशाप्रकारे रु. ७०० कोटींपेक्षा अधिक भांडवल उभे केले आहे.

‘इंडिया वन फाऊंडेशन’चा ‘सुवर्ण महाराष्ट्र’ उपक्रम
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी
प्रतिनिधी

दादर येथील इंडिया वन फाऊंडेशनने यंदा महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती महोत्सवाचे औचित्य साधून ‘सुवर्ण महाराष्ट्र’ या अभिनव सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन केले आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमी, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि कालनिर्णय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत २८ मार्चपासून दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये नृत्य, नाटय़, संगीत, कला आधी क्षेत्रातील नवोदित व बुजूर्ग लोककलावंतांचा सहभाग असेल. प्रथितयश कलाकारांशी संवाद तसेच उदयोन्मुख कलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येत्या २८ मार्च रोजी सुवर्ण महाराष्ट्रचे पहिले पुष्प गुंफण्यात येणार आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत अंबेजोगाई येथील शास्त्रीय गायिका भागश्री देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध व्हायोलिन वादक महेश खानोलकर हे यांचे व्हायोलिन वादन व मुलाखतीचा कार्यक्रम त्यानंतर होईल. रात्री ८.०० ते ९.०० यावेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात अभिनेते पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. अधिक माहितीसाठी संपर्क : ९८६९२८७९८५ / ९८९२८४१२२९.

व्होडाफोनवर ‘इलेक्शन अ‍ॅलर्ट्स’
व्यापार प्रतिनिधी:
सेल्युलर फोन सेवाक्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘व्होडाफोन एस्सार’ने आपल्या ग्राहकांसाठी येत्या लोकसभा निवडणुकांबद्दलचे इलेक्शन अ‍ॅलर्ट देणारी सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे. देशातील निवडणुकांच्या अनुषंगाने होणाऱ्या राजकीय
घडामोडींची व्होडाफोन ग्राहकांना सतत माहिती देणे हे या सेवेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘व्होडाफ ोन इलेक्शन अ‍ॅलर्ट पॅक’ मधून ग्राहकांना उमेदवारांचा परिचय, आधीच्या निवडणुकांबद्दलची वैशिष्टय़पूर्ण माहिती, महत्त्वाच्या मतदारसंघांची ओळख, निवडणुकांबद्दलच्या ताज्या बातम्या आणि मतदानाचे निकाल मिळू शकतील, या इलेक्शन अ‍ॅलर्टसाठी व्होडाफोनने एनडीटीव्ही या प्रसारण कंपनीशी करार केला आहे. व्होडाफोन ग्राहकांना दरमहा रु. ३० एवढे शुल्क देवून दिवसाला चार वेळा ही निवडणूकविषयक माहिती मिळेल. ही सेवा सुरू करण्यासाठी व्होडाफोन ग्राहक * 123*527 या क्रमांकाचा दूरध्वनी करू शकतील. हे इलेक्शन अ‍ॅलर्ट ३१ मे २००९ पर्यंत उपलब्ध असतील.

रिलायन्स जीएसएमची ‘एसटीडी’ ऑफर
व्यापार प्रतिनिधी:
रिलायन्स मोबाइलने आपल्या जीएसएम ग्राहकांसाठी फक्त ७० रुपये मूल्याचे ‘एसटीडी’ पॅक जाहीर केले आहे. या पॅकमध्ये जीएसएम प्रीपेड ग्राहकांना ७० रुपये भरून देशातील कोणत्याही भागात कोणत्याही नेटवर्कवर १०० मिनिटे ‘एसटीडी’ फोन करता येईल. ही १०० मिनिटे ग्राहकांना ३० दिवसांत वापरता येतील. प्रोत्साहनपर ऑफर म्हणून सादर केलेली ही १०० मिनिटे, ३१ मार्चपर्यंत ७० रुपयांचा ई-रिचार्ज करून मिळविता येतील. फेब्रुवारी २००९ या एकाच महिन्यात रिलायन्स मोबाइल जीएसएमने आपल्या ग्राहकांच्या संख्येत ३३ लाख ८० हजार नव्या ग्राहकांची भर घातली आहे. सतत वाढणाऱ्या ग्राहकसंख्येच्या आधारावर रिलायन्स मोबाइल ही सतत दुसऱ्या महिन्यात भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात लोकप्रिय मोबाइल फोन सेवा देणारी कंपनी ठरली आहे.

टेहळणी तंत्रज्ञानाने सुसज्ज अ‍ॅक्सिस बँकेचे ४०० एनसीआर एटीएमचे जाळे
व्यापार प्रतिनिधी:
अ‍ॅक्सिस बँक एनसीआर कंपनीची ४०० नवी एटीएमचे जाळे उभारणार असल्याची घोषणा एनसीआर कॉर्पोरेशन कंपनीने आज केली. या सर्व एटीएम यंत्रावर एनसीआरचे सव्‍‌र्हिलियन्स सोल्यूशन्स म्हणजेच टेहेळणी करणारे तंत्रज्ञान बसविण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एटीएम यंत्र वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे त्याने केलेल्या व्यवहारासह चित्रीकरण केले जाणार आहे. यामुळे एटीएम यंत्रामध्ये होणारे घोटाळे टाळण्यास मदत होणार आहे. अ‍ॅक्सिस बँकेने एनसीआरकडून एनसीआर पर्सोनास ७७ सोलो एटीएम प्रकारची एटीएम यंत्रे खरेदी केली आहेत. या यंत्रामुळे अ‍ॅक्सिस बँकेला आपल्या ग्राहकांना नवे सॉफ्टवेअर व हार्डवेअरच्या माध्यमातून बिल पेमेंट, चेक भरणा, तिकीट आरक्षण आणि मोबाईल टॉपअप्स यासारख्या नव्या सेवा पुरविणे सोपे होणार आहे. या व्यवहाराविषयी अ‍ॅक्सिस बँकेच्या रिटेल बँकिंग विभागाचे उपाध्यक्ष अ‍ॅस्पी इंजिनीअर म्हणाले, ‘‘ग्राहकांची सोयीसुविधा व व्यवहार वाढवून ग्राहकांशी अधिक संपर्क निर्माण करण्याच्या व्यूहरचनेनुसारच ही एटीएम यंत्रे बसविण्यात येत आहेत. आम्ही ग्राहकांस उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी बिनतोड तंत्रज्ञानाचा आधार घेत आहोत. आमच्या एटीएम नेटवर्कचा विस्तार करताना तसेच ग्राहकांच्या वाढत्या गरजा भागवताना एनसीआरसोबत भागीदारी करून आम्हाला खूपच आनंद होत आहे.

सामा टेक्नॉलॉजी आणि पेन्टाओ कॉर्पोरेशन यांच्यात करार
व्यापार प्रतिनिधी:
पेन्टाओ कॉर्पोरेशन संस्थेबरोबर पुण्याच्या सामा टेक्नॉलॉजीने भागीदारी करार केला आहे. या करारानुसार सामा ही कंपनी पेन्टाओच्या ग्राहकांना तयार व योग्य बिझनेस इंटिलिजन्स सोल्यूशनचा पुरवठा करेल. यामुळे कंपनीच्या जागतिक उत्पादन व सेवा यांचा विस्तार जलद होण्यास मदत होईल, तसेच आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचून सर्वोत्तम सेवा देण्यासाठी त्या देशातील भौगोलिक व सांस्कृतिक माहितीच्या आधारे विशेष अभ्यास करून मार्गदर्शन करताना त्याचा लाभ घेता येईल. सामा ही बिझनेस इंटिलिजन्स सेवा देणारी जगातील सर्वात मोठी बिझनेस इंटिलिजन्स आणि डेटा मॅनेजमेंट सोल्यूशन्स पुरविणारी कंपनी आहे. त्यांनी स्थापत्य आणि डिलिव्हरी रस्त्यांचे नकाशे, डेटा इंटिग्रेशन, अ‍ॅनलिटिक्स, डेटा मायनिंग आणि मेटा डेटा मॅनेजमेंट अशासारख्या व्यावसायिकतेच्या बहुतेक सर्व क्षेत्रांत उपलब्ध असलेल्या माहितीतून पृथक्करण करून मार्गदर्शक आणि मौल्यवान सल्ले दिले आहेत. गेल्या १२ वर्षांत सामाने जगातील ८००हून अधिक मोठय़ा आणि मध्यम कंपन्यांना उच्च तंत्रज्ञान, आर्थिक सेवा, लाइफ सायन्स, उत्पादकता आणि विविध प्रकारची कामे करून त्यांचा व्यवसाय वाढविला आहे.