Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

महंत राजधरबाबा महानुभाव यांना अखेरचा निरोप
कोपरगाव, २५ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील संवत्सर येथील महानुभाव आश्रमाचे संस्थापक महंत दुसरे राजधरबाबा दिवाणचंद महानुभाव यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला.
श्रीमद् भगवद्गीतेतील पंधरा अध्यायांचे या वेळी पठण करून महानुभाव पंथियांच्या रितीरिवाजाप्रमाणे

 

अंत्यसंस्कार करण्यात आले.
महंत राजधरबाबांचे लोणीच्या प्रवरा रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह संध्याकाळी संवत्सरच्या आश्रमात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला. या वेळी राज्यभरातून आलेल्या त्यांच्या अनुयायी, शिष्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. आज सकाळी महंत राजधरबाबांचे पार्थिव गुलाब पुष्पांनी सजवलेल्या ट्रॉलीत ठेवण्यात आले. टाळ, मृदंग व अभंगाच्या गजरात त्यांची शोभायात्रा काढण्यात आली. त्या वेळी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’, ‘महंत राजधरबाबा अमर रहे’, ‘प्रभूश्री चक्रधरस्वामींचा जयजयकार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे, नगराध्यक्ष मंगेश पाटील, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी सभापती कारभारी परजणे, ‘कोपरगाव’चे उपाध्यक्ष कारभारी परजणे, पंचायत समितीचे सदस्य कृष्णराव परजणे उपस्थित होते.
राजधरबाबांनी केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांना बिपीन कोल्हे, नगराध्यक्ष मंगेश पाटील, राष्ट्रसंत जनार्दनस्वामी आश्रमाचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण, संत रमेशगिरीमहाराज, जंगलीमहाराज आश्रमाचे संत देवानंदमहाराज, वकील आर. जी. चिने, अमरावती रिद्धपूरचे गोपीराजबाबा, डोमेग्रामचे नागराजबाबा, जाळीचा देव येथील लोणारकर, पांगरीकर, आंबेकरबाबा आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.