Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

योग पारंगत पदविका अभ्यासक्रमात डॉ. जीजा पवार प्रथम
पुणे, २५ मार्च/प्रतिनिधी

योगसाधना संस्थेचा २३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी डॉ. सुहास

 

हेर्लेकर यांच्या हस्ते योग पारंगत पदविका प्रदान करण्यात आल्या.
योग पारंगत पदविका अभ्यासक्रमात डॉ. जीजा पवार यांनीसर्वप्रथम येण्याचा मान पटकाविला असून योगासनामध्ये कांचन बापट, प्रकल्पामध्ये कल्पना राठोड, शुद्धिक्रियामध्ये अंजली शहा आणि थिअरी विषयात चित्रलेखा शुक्रु यांनी प्रावीण्य मिळविले.
संस्थेतर्फे वा.दा. थत्ते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत नीलम डागा, रश्मी जोशी, मनोरमा बोकील यांनी यश प्राप्त केले.
महिलादिनानिमित्त घेण्यात आलेल्या सासू-सून समन्वय स्पर्धेत सुजाता व सुप्रिया ढेरे, शुभदा व दीपाली मेहता, अलका व अबोली लिमये या सासू-सुनांनी यश मिळविले. त्यांना पुणे महिला मंडळाच्या अध्यक्षा मृणालिनी धडफळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेसाठी डॉ. मधुरा कसबेकर, ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या वेळी मनाली देव, विशाखा दीक्षित, लीना दुधाट, शैलजा मुळगुंद, अश्विनी इनामदार, शैलजा आडकर, वर्षां चितळे या विद्यार्थिनींनी विविध आसनांची प्रात्यक्षिके सादर केली.
या प्रसंगी विष्णुपंत मेहेंदळे, सुनीती भिडे, पूनम कर्वे, शीला डांगे यांचा प्रियंवदा हेर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वीणा सहस्रबुद्धे यांनी संस्थेची माहिती दिली. सविता गांधी यांनी सूत्रसंचालन केले.