Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभीच देणार ’
िपपरी, २५ मार्च / प्रतिनिधी

टक्केवारीचे राजकारण आणि दफ्तरदिरंगाईमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविण्यास प्रचंड विलंब होण्याची परंपरा यंदा खंडित करण्याचा दावा करीत शिक्षण मंडळाने पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या ५० हजार विद्यार्थ्यांना शक्य तितके साहित्य शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभीच उपलब्ध करुन

 

देण्यात येईल, अशी ग्वाही देखील दिली आहे.
गणवेश, बूट, मोजे, वह्य़ा, रेनकोट, पाटी, दफ्तर यासारखे सर्व शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना आजपर्यंत कधीही वेळेवर मिळालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याचे प्रकार सातत्याने झाले असून टक्केवारीचे राजकारण हेच यामागचे प्रमुख कारण असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. यंदा लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता असल्याने इतर कोणतीही कामे करता येत नाहीत. त्यामुळे मंडळाकडे भरपूर वेळ उपलब्ध असल्याचा फायदा घेत प्रशासनाकडून या साहित्यांचे वाटप करण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. येत्या १५ जूनपासून शाळा सुरु होत असल्याने त्यानंतर काही दिवसात विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळू शकेल, असे मंडळाचे प्रशासन अधिकारी हरी भारती यांनी सांगितले. यावेळी सदस्य रवी खन्ना आणि गजानन चिंचवडे यांनीही दुजोरा दिला. काही तांत्रिक कारणांमुळे शालेय साहित्य वाटपास उशीर होत होता, अशी कुबली देतानाच यापुढे वेळेवर साहित्य देण्याचा प्रयत्न राहील, असे भारती यांनी म्हटले आहे.