Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जमतानी ट्रेडर्समध्ये चोरी ; ७१ हजारांची लूट
िपपरी, २५ मार्च / प्रतिनिधी

पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या िपपरी-खराळवाडी येथील जमतानी ट्रेडर्समध्ये आज पहाटे चौघा लुटारूंनी रखवालदाराचे हातपाय बांधून तिजोरीतील ७१ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
िपपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चरणसिंग जोतमल

 

जमतानी (वय ५३, रा. संजय अपार्टमेंट, जयहिंदू कॉलेजजवळ, पिंपरी) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. जमतानी यांचे खराळवाडीमध्ये जमतानी ट्रेडर्स नावाचे फर्निचर व बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान आहे. आज पहाटे दीडच्या सुमारास चौघांनी पाणी पिण्याच्या बहाण्याने ट्रेडर्सचा रखवालदार भीमासिंग भिला याचे हात-पाय बांधून दालनात प्रवेश केला. तेथील तिजोरीतून ७१ हजार पाचशे रुपयांचा माल चोरून नेला. पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील, सहायक आयुक्त प्रभाकर पाटील, वरिष्ठ निरीक्षक शरद सुर्वे, सहायक निरीक्षक बाळासाहेब काळे, फौजदार सतीश कांबळे, ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाने पाहणी केली. श्वान तेजा याने केलेल्या पाहणीमध्ये िपपरी रेल्वे स्थानकापर्यंत माग काढला. ही चोरी झाली तेव्हा जमतानी यांच्याकडून २५ लाख रुपयांचा माल चोरीस गेल्याचा गाजावाजा केला. यानंतर तक्रार दाखल करण्याच्यावेळी केवळ ७१ हजार पाचशे रुपयांचा माल चोरीस गेल्याचे कबूल केले. रखवालदाराने व दालन मालकाने दिलेल्या जबाबात तफावत आढळून येत असल्याने त्यांनी उलट तपासणी करण्याचे ठरविले आहे. अधिक तपास फौजदार बाळकृष्ण नलावडे करीत आहेत.
बिजलीनगरमध्ये घरफोडी
बिजलीनगर चिंचवड येथे आज सकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान चोरटय़ांनी आणखी एका फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी प्रमोद यलप्पा लाटूकर (वय २९, रा. महालक्ष्मी अपार्टमेंट, बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. लाटूकर यांच्या आईचे ब्रेन टय़ूमरचे ऑपरेशन झाले असल्याने ते पुण्यात गेले होते. दरम्यान, चोरटय़ांनी त्यांच्या घराचा कोयंडा तोडून घरातील ४३ हजार पाचशे रुपयांचा माल चोरून नेला. तसेच याच इमारतीतील तळमजल्यावर असलेली सदनिका फोडून चोरटय़ांनी एक डीव्हीडी प्लेअर चोरून नेला आहे.