Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आयपीएल इंग्लंडबाहेर गेल्याने ब्रिटीश मीडिया नाराज
लंडन, २५ मार्च/ पीटीआय

 

ट्वेंन्टी-२० च्या ‘फास्टफूड’ खेळाची लज्जत लुटण्याबरोबरच पैशांची खाण असलेली इंडियन प्रीमिअर लीग इंग्लंबाहेर गेल्याने ब्रिटीश मीडिया नाराज झाली असून त्यांनी याबद्दल हळहळसुद्धा व्यक्त केली आहे.
इंग्लंडमधील ‘ दी टाईम्स’ या वृत्तपत्राने ’ दक्षिण आफ्रिकेतील पोषक वातावरणात आयपीएल गेली’ अशी ‘हेडलाईन’ दिली आहे. तर बातमीच्या शेवटी आयपीएल ही पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये होत नसली तरी ती द. आफ्रिकेत कशी काय होऊ शकते. हे सारे अनाकलनीय आहे.
या संदर्भात आयपीएलचे कमीशनर ललीत मोदी म्हणाले की, इग्लंडमधील वातावरण हे क्रिकेटसाठी अनुकूल नसण्याने आयपीएल द. आफ्रिकेत घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण हे विधान इंग्लंडच्या प्रसारमाध्यमांना पटत नसून दोन्ही देशांमधील वाईट संबंधांमुळे हा निर्णय घेणात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर चांगल्या नातेसंबंधांचा फायदा द. आफ्रिकेला मिळाला असल्याचे त्यांना वाटते. त्याचबरोबर बीसीसीआयच्या या दक्षिण आफ्रिकेत आयपीएल घेण्याच्या निर्णयाने दोन्हीही बोर्डातील संबंध आधिकाधिक दृढ होतील. त्याचबरोबर गेल्यावर्षी झालेला ट्वेंन्टी-२० विश्वचषक भारताने जिंकल्यामुळे त्यांना आयपीएल आफ्रिकेत खेळविण्यास भर दिला असेल, असेही ब्रिटीश प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.
आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत गेल्याने सर्वात जास्त नुकसान झाले आहे इग्लंडच्या खेळाडू्ंचे. त्याचबरोबर येथील मौदानांचे आणि अन्य बऱ्याच गोष्टींचे नुकसान होणार झाले आहे. आयपीएल एका आठवडय़ाने लांबणीवर पडल्याने १८ एप्रिल ते २४ मे दरम्यान स्पर्धा खेळविण्यात येणार असल्याने यावेळचे आकर्षण ठरलेल्या इंग्लंडच्या अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिनटॉफ आणि केव्हिन पीटरसन यांना तीनच आठवडे खेळण्यात येणार असून त्यांना जवळपास सहा सामनेच खेळता येतील, असे ‘दी टेलीग्राफ’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.