Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आय.डी.बी.आय., देना बँक विजयी
मुंबई, २५ मार्च/क्री.प्र.

 

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित केलेल्या ५४ व्या सर बेनेगल रामराव आंतर बँक क्रिकेट स्पर्धेच्या सीनियर गटात आय.डी.बी.आय., देना बँक आणि महाराष्ट्र बँकेने विजयी सलामी दिली. साखळी सामन्यातील पहिल्याच लढतीत आय.डी.बी.आय.ने यजमान रिझव्‍‌र्ह बँक संघावर ५१ धावांनी विजय मिळवला तर देना बँकेने युनियन बँकेवर ६४ धावांनी मात केली. अन्य एका लढतीत बँक ऑफ महाराष्ट्रने बँक ऑफ इंडियावर सनसनाटी विजय मिळवला. तत्पूर्वी कर्नाटक स्पोर्टिगवर रिझव्‍‌र्ह बँकेचे महाप्रबंधक आर.सी.दास, सहाय्यक महाप्रबंधक पी.एस.रंगाराव, एम.सी.ए.च्या पंच समितीचे सचिव पटवर्धन, स्पर्धा समिती प्रमुख एस.डी. कोरगांवकर, प्रदीप पंडित यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
सीनियर डिव्हिजन : आय.डी.बी.आय.- ९ बाद १६३ (सुनील चावरी नाबाद ६२; पवनकुमार ४३/३, राजेश घरसोंडिया १२/२) वि. वि. रिझव्‍‌र्ह बँक- सर्वबाद ११२ (यशवंत भोसले ३२, हर्षल नंदू १६/५, सुनील चावरी ३१/२) सामनावीर- सुनील चावरी. देना बँक ८ बाद २४४ (राज सावंत ७०, केरसी पावरी ३५, विनोद राघवन ४०, अरुण शेट्टी ३२/२) वि. वि. युनियन बँक १८० (प्रशांत सावंत ३०/३, जलाल शेख ३०/३, रहिमानी सुफियाँ २६/३) सामनावीर- राज सावंत. बँक ऑफ महाराष्ट्र १७६ (प्रथमेश पवार ५६) वि. वि. बँक ऑफ इंडिया ८८ (नरेश शानभाग १९/२, संतोष जगताप १७/२, जयू सावंत ८/२) सामनावीर- प्रथमेश पवार. ज्युनियर गट (बाद फेरी)- टांकसाळ ८२ (योगेश १८/३, कैलास १३/२, दिनेश ११/२) पराभूत वि. इन्डसिंध बँक १ बाद ८५ (साखर घाडीगांवकर नाबाद ५१), मुंबई जिल्हा सह. बँक १०७ (महेंद्र धाणे ३०, सुरेश देशमुख १३/४, राहुल ऊंद्रे १८/३) पराभूत वि. महाराष्ट्र राज्य सह. बँक २ बाद १०९ (अभिषेक चौधरी ४४), कोकण र्मकटाईल सह. बँक ८२ (निलेश बागवे ६/३, किरण राऊत ६/२, विकास साठे १७/२, मुकेश मोरे २८/२), पराभूत वि. नाबार्ड २ बाद ८३ (निरुपम मेहरोत्रा ३४).