Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
  नववर्ष स्वागतयात्रा
  थर्ड आय
  कट्टा :
सोशल नेटवìकग साइट्स
  दवंडी :
एक मरणाची रिअ‍ॅलिटी..
  क्रेझी कॉर्नर :
पिंपल्स आणि रिंकल्स
  स्मार्ट बाय : कॅरेटलेन
  ग्रूमिंग कॉर्नर : आपण स्वतला कसं सुधारू शकतो?
  मेल बॉक्स :
सुवर्णमध्य साधला पाहिजे
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  कहाणी साखरगाठींच्या जन्माची
  गोड, गोड गाठी..

तयारी

संध्या : चल, जमल्या ना ग सगळ्याजणी! मग कामाला सुरुवात करू या. कारण आज माधुरी तर येणारच नाहीये. ती अजून गावाहून परतच आली नाहीये. रेखाही उद्या रश्मीकडचे गुढीपाडव्यानिमित्त येणार आहेत म्हणून थोडी उशिरा येईन म्हणालिये.
पद्मजा : अगं, सांगायचस तिला की आज नाही आलीस तरी चालेल. अजून लग्नाचा शिणवटाही उतरला नसेल.
संध्या : मी म्हटलं तिला, पण रेखा ऐकणार आहे का?
नंदिनी : आणि माधुरीच्या बहिणीची तब्येत कशी आहे आता?
संध्या : कालच रात्री फोन आला होता तिचा. उद्या गुढीपाडवा म्हणजे आज आपल्या सोसायटीत कशी धूमशान असते माहित्येय ना सगळ्यांना. मग माधुरीला कसली चैन पडतेय. फोन आलाच तिचा. पण आता बहिणीच्या तब्येतीचा धोका टळलाय म्हणाली.
पद्मजा : माधुरीचं आणि रश्मीचं किती गूळपीठ आणि नेमकी माधुरीच लग्नाला नव्हती.
संध्या : हो नं. एकदमच तिची बहीण सिरीयस झाली. मग माधुरीला जावंच लागलं. माधुरीचा जीव दोघींमध्येही अडकलेला. पण माधुरीचं नसणं रश्मीला फार जाणवलं बघ.
नंदिनी : हो नं. अग, लहानपणी माधुरीनंच तिला सांभाळलंय ना. रेखाला तिनं मुळी सांगूनच टाकलं होतं, रश्मीला तू माझ्याकडेच ठेव. मंदार-मिहीरबरोबर तिलाही सांभाळेन.
वैशाली : आधीच माधुरीला लहान मुलांची भारी हौस. पूर्वीच्या काळात जन्मली असती ना तर मला वाटतं, दहा-बारा मुलं सहज होऊ दिली असती.
संध्या : हो नं. तिला मुलीचीही कोण हौस. मुलीची सगळी हौस तिनं रश्मीच्या रूपात भागवून घेतली.
संध्या : तर काय! रश्मीही तशी लाघवी. त्यामुळं दोघींचं छान जमतं. रेखालाही त्यामुळे बिनधास्त नोकरी करता आली.
पद्मजा : रेखा माधुरीला मानते ते काही उगीच नाही. तिनंही याची पुरेपूर जाण ठेवली आहे. रेखाच काय ग, पण आपणही तर किती वेळा आपल्या मुलांना माधुरीला सोडून गेलो आहोत.
नंदिनी : ‘कमी तिथं आम्ही’ ही भूमिका माधुरी किती सहज स्वीकारू शकते नाही! मला नाही बाई असं जमत.
पद्मजा : अगं, तिला काही आपल्यासारखे नोकरीचे पाश नव्हते.
नंदिनी : ते खरं आहे ग. पण वृत्तीही लागतेच ना. नोकरी न करणाऱ्या किती तरी बायका असतात, पण सगळ्यांची वृत्ती थोडीच अशी असते?
संध्या : आणि नोकरी करत नसली तरी माधुरीकडचा गोतावळा किती मोठा आहे! चार दीर.. तीन नणंदा.. गोकुळ आहे नुसतं. सारखं कुणी ना कुणी तरी असतंच तिच्याकडे आणि ही ही करत असते सगळ्यांची उस्तवार.
पद्मजा : तिच्या याच स्वभावाचा फायदा घेतात नां सगळेजण. आतासुद्धा दोन नणंदांची मुलं आहेतच शिकायला.
वैशाली : मी परवाच म्हटलं तिला, स्वयंपाकाला बाई ठेव आता. चार तरुण मुलं घरात. खूप लागतं गं.
नंदिनी : बाकी सगळ्या स्वयंपाकाचं कसंही जगतं पण पोळ्यांचा भारी कंटाळा येतो. आणि ही वाढत्या वयाची मुलं.. त्यांचं खाणं चांगलं दणदणीत असतं.
पद्मजा : अगं, पराग तर हल्ली काय म्हणतो माहित्येय का? पूर्वी त्याला माझ्या हातच्या पातळ, लुसलुशीत पोळ्या किती आवडायच्या. पण आजकाल म्हणतो, आई, तू चांगल्या जाड जाड पोळ्या कर.
नंदिनी : ते का?
पद्मजा : सांगते ना. त्यातच गंमत आहे. तो म्हणतो, पातळ पोळ्या खूप खाव्या लागतात. मग सारख्या पोळ्या मागायची लाज वाटते. त्यापेक्षा जाड जाड पोळ्या थोडय़ा खाल्ल्या की, काम भागतं.
नंदिनी : इश्श! काहीतरीच बाई! आणि घरातलं खायला कशाला लाज वाटायला पाहिजे? हव्या तेवढय़ा खा म्हणावं.
पद्मजा : ते तर मी सांगितलंच गं त्याला. पण माधुरीलाही विचारलं, माझ्या जावेकडे येतात, त्या पोळ्याच्या बाईंना पाठवू का, तर ‘नको’ म्हणाली.
संध्या : त्याला कारण आहे. अगं, मुली काय मदत करतील, अशी मदत ही चारही मुलं करतात तिला. घरातली सगळी कामं करतात. अगदी भाजी निवडण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत.
पद्मजा : हो गं. तिनं मुळी प्रत्येकाचं टाईमटेबलच ठरवून टाकलंय.
संध्या : अगं, ती लाख ठरवेल पण मुलांनी ऐकलं पाहिजे ना. आमच्याकडे येऊन बघा. एवढी कानीकपाळी ओरडत असते, पण नुसता आनंदीआनंद आहे. ताटावरून पाटावर आणि पाटावरून ताटावर चाललेलं असतं..
नंदिनी : बोलता बोलता सगळी कामं झाली की गं आपली. कामाला बोलण्याची जोड असेल तर हातही कसे पटपट चालतात नाही. पण झेंडूच्या या माळा लावायला वानरसेनाच हवी. गेलेत कुठे सगळे!
सलील : आपने बुलाया और हम चले आए. कडुलिंबका पाला लेकर आए है..
संध्या : अच्छा, या कामगिरीवर गेला होतात होय. पण झाडावरची सगळी पानं नाही ना ओरबाडून आणलीत. शंतनू ओरडेल नाही तर..
सलील : नही माँसाहेब. घरटी एकच फांदी आणलीये. तू म्हणतेस तसं शास्त्रापुरतं.
वैशाली : अरे वा! सलील, तू अगदी तयार झाला आहेस हं!
सलील : कसचं! कसचं! बरं माँसाहेब, और क्या हुकूम! नाही तर परत जाहीर उद्धार करशील.. ताटावरून पाटावर.. आणि पाटावरून ताटावर..
संध्या : तेवढं बरं ऐकलंस.. नको तिथं कान अगदी तिखट होतात. बरं ते जाऊ दे. पाडव्याच्या पूर्वसंध्येला तरी वादाचे विषय दूर ठेवूयात. खूप कामं आहेत. बाकीचे सगळे कुठे गेले?
सलील : शंतनू आणि शामली सगळ्या मुलांना घेऊन सोसायटी साफ करताहेत. नीरज अँड टीम बाजारात गेलीये. गाठय़ा-पेढे आणायला. मी माझ्या टीमला घेऊन माळा-बिळा लावायला जातो. उद्या आपली सोसायटी कशी चकाचक दिसली पाहिजे.
पद्मजा : म्हणजे काय? दर गुढी पाडव्यालाच आपली सोसायटी नटते-थटते.
संध्या : पण उद्याचा पाडवा विशेष आहे ना!
पद्मजा : तो का?
संध्या : अगं, उद्या आपल्या सोसायटीत ते चॅनलवाले येणारेत ना शूटिंगसाठी..
सलील : आई.. तू म्हणजे नं.. भांडा फोड दिया..
संध्या : अगं बाई, खरंच की! विसरूनच गेले बघ.
पद्मजा : अच्छा, म्हणजे आम्हाला न सांगता सगळा घाट घातला होतात होय.. पण हे सगळं जुळलं कसं काय?
सलील : अगं, शाश्वतीची मीडियामध्ये खूप ओळख आहे. या चॅनलच्या रिपोर्टरशी ती आपल्या सोसायटीतल्या गुढी पाडवा सेलिब्रेशनबद्दल बोलत होती. ती मुलगी इतकी एक्साईट झाली की, म्हणाली, मी उद्या कॅमेरामनला घेऊन येतेय.
नंदिनी : अगं, पण. शाश्वती तर आता आता आलीये ना सोसायटीत. तिला काय माहीत?
संध्या : ही आपली सगळी वानरसेना आहे ना. तिच्याशी सारख्या गप्पा चाललेल्याच असतात. परवाच मला फोनवर सांगत होता की, या सोसायटीत नव्यानं आल्यासारखं वाटतच नाही.
नंदिनी : चला, म्हणजे शाश्वतीमुळे आपली सोसायटी टीव्हीवर झळकणार तर. अरे, पण त्या चॅनलवाल्यांना आमच्यावर पण कॅमेरा घ्यायला सांगा हं. नाही तर नेहमीप्रमाणे तिथंही तुम्हा तरुण मंडळींचीच वर्णी लागेल.
सलील : सांगतो काकू, सांगतो. सगळ्या होम मिनिस्टर्सचं कव्हरेज अगदी व्यवस्थित घ्यायला सांगतो.
नंदिनी : हो का? मग मी निघते. चला ग, तुम्हीही सगळ्याजणी निघा. गुढी पाडव्याची तयारी झालीये. आता आपलीही तयारी करू या. टीव्हीवर दिसणार आहोत ना?
आणि पाटावरून ताटावर चाललेलं असतं..
नंदिनी : बोलता बोलता सगळी कामं झाली की गं आपली. कामाला बोलण्याची जोड असेल तर हातही कसे पटपट चालतात नाही. पण झेंडूच्या या माळा लावायला वानरसेनाच हवी. गेलेत कुठे सगळे!
सलील : आपने बुलाया और हम चले आए. कडुलिंबका पाला लेकर आए है..
संध्या : अच्छा, या कामगिरीवर गेला होतात होय. पण झाडावरची सगळी पानं नाही ना ओरबाडून आणलीत. शंतनू ओरडेल नाही तर..
सलील : नही माँसाहेब. घरटी एकच फांदी आणलीये. तू म्हणतेस तसं शास्त्रापुरतं.
वैशाली : अरे वा! सलील, तू अगदी तयार झाला आहेस हं!
सलील : कसचं! कसचं! बरं माँसाहेब, और क्या हुकूम! नाही तर परत जाहीर उद्धार करशील.. ताटावरून पाटावर.. आणि पाटावरून ताटावर..
संध्या : तेवढं बरं ऐकलंस.. नको तिथं कान अगदी तिखट होतात. बरं ते जाऊ दे. पाडव्याच्या पूर्वसंध्येला तरी वादाचे विषय दूर ठेवूयात. खूप कामं आहेत. बाकीचे सगळे कुठे गेले?
सलील : शंतनू आणि शाल्मली सगळ्या मुलांना घेऊन सोसायटी साफ करताहेत. नीरज अँड टीम बाजारात गेलीये. गाठय़ा-पेढे आणायला. मी माझ्या टीमला घेऊन माळा-बिळा लावायला जातो. उद्या आपली सोसायटी कशी चकाचक दिसली पाहिजे.
पद्मजा : म्हणजे काय? दर गुढी पाडव्यालाच आपली सोसायटी नटते-थटते.
संध्या : पण उद्याचा पाडवा विशेष आहे ना!
पद्मजा : तो का?
संध्या : अगं, उद्या आपल्या सोसायटीत ते चॅनलवाले येणारेत ना शूटिंगसाठी..
सलील : आई.. तू म्हणजे नं.. भांडा फोड दिया..
संध्या : अगं बाई, खरंच की! विसरूनच गेले बघ.
पद्मजा : अच्छा, म्हणजे आम्हाला न सांगता सगळा घाट घातला होतात होय.. पण हे सगळं जुळलं कसं काय?
सलील : अगं, शाश्वतीची मीडियामध्ये खूप ओळख आहे. या चॅनलच्या रिपोर्टरशी ती आपल्या सोसायटीतल्या गुढीपाडवा सेलिब्रेशनबद्दल बोलत होती. ती मुलगी इतकी एक्साईट झाली की, म्हणाली, मी उद्या कॅमेरामनला घेऊन येतेय.
नंदिनी : अगं, पण शाश्वती तर आता आता आलीये ना सोसायटीत. तिला काय माहीत?
संध्या : ही आपली सगळी वानरसेना आहे ना. तिच्याशी सारख्या गप्पा चाललेल्याच असतात. परवाच मला फोनवर सांगत होती की, या सोसायटीत नव्यानं आल्यासारखं वाटतच नाही.
नंदिनी : चला, म्हणजे शाश्वतीमुळे आपली सोसायटी टीव्हीवर झळकणार तर. अरे, पण त्या चॅनलवाल्यांना आमच्यावर पण कॅमेरा घ्यायला सांगा हं. नाही तर नेहमीप्रमाणे तिथंही तुम्हा तरुण मंडळींचीच वर्णी लागेल.
सलील : सांगतो काकू, सांगतो. सगळ्या होम मिनिस्टर्सचं कव्हरेज अगदी व्यवस्थित घ्यायला सांगतो.
नंदिनी : हो का? मग मी निघते. चला ग, तुम्हीही सगळ्याजणी निघा. गुढीपाडव्याची तयारी झालीये. आता आपलीही तयारी करू या. टीव्हीवर दिसणार आहोत ना?
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.com