Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कुंडेवहाळ, कर्नाळा ग्रामपंचायतीत शेकापची सरशी
पनवेल/प्रतिनिधी - पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ आणि कर्नाळा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाची सरशी झाली आहे.
या ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान होऊन गुरुवारी मतमोजणी पार पडली. यापूर्वी काँग्रेस

 

पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या कुंडेवहाळ ग्रामपंचायतीच्या नऊपैकी नऊ जागा जिंकत शेकाप आणि ग्रामविकास आघाडीने काँग्रेसला धूळ चारली. आमदार विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या जनसेवेचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया शेकापचे ओवळे विभाग चिटणीस जी. के. म्हात्रे यांनी व्यक्त केली.
कर्नाळा ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. शेकापचे नेते भ्रष्टाचारी असून त्यांना पाताळगंगा नदीत बुडवा, असे आक्रमक आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याने या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष होते, परंतु या ग्रामपंचायतींमधील १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवित शेकापने बालेकिल्ला राखला. हा विजय म्हणजे लोकसभेच्या विजयाची नांदी आहे, अशी प्रतिक्रिया शेकापचे नेते बाळाराम पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान चितळे ग्रामपंचायतीच्या ११ पैकी आठ जागा जिंकून काँग्रेसने आपली सत्ता राखली.