Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजित संगीत महोत्सवात शुक्रवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झी मराठी प्रस्तुत सारेगमप लिटिल चॅम्प्स स्पर्धेची विजेती कार्तिकी गायकवाड हिच्यासह आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे यांनी कार्यक्रम सादर केला.

डीएसके सर्व उमेदवारांना चहापानाला बोलावणार
पुणे, २७ मार्च/विशेष प्रतिनिधी

‘पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या सर्व प्रमुख उमेदवारांना मी येत्या रविवारी आपल्या निवासस्थानी चहापानासाठी बोलाविणार आहे आणि आपल्यापैकी कोणीही निवडून आला तरी त्याने पुणेकरांचे कोणते प्रश्न सोडवायचे, याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे,’..
हे विधान कोणा मतदाराचे नाही तर चक्क पुण्यातून बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढविणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचे आहे.

वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना अटक
पुणे, २७ मार्च / प्रतिनिधी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून कसबा पेठेतील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यास वीस लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पाच भामटय़ांच्या टोळीला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून ससून रुग्णालयाच्या आवारात आज दुपारी अटक केली.

गैरप्रकारांचे पडसाद स्थगन प्रस्तावाद्वारे उमटणार
पुणे, २७ मार्च/खास प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रापासून शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेमध्ये झालेले गैरप्रकार, प्राध्यापक संघाच्या अध्यक्षांसह वकिलाला देण्यात आलेली धमकी, अशा अनेकविध घडामोडींचे पडसाद पुणे विद्यापीठाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीत स्थगन प्रस्तावांच्या माध्यमातून उमटणार आहेत.

‘दादां’वर संक्रांत..
‘दादा’, ‘नाना’ अशी नुसती नावं वाचली की, धडकी भरायला होते. अहो, आपलं सामान्यांचं सोडा. त्या पांढऱ्या-खाकी वर्दीतल्या पोलिसांचीही आपल्यासारखीच अवस्था! कल्पक डोक्यातून मोटारींच्या नंबरप्लेटवर उमटलेल्या या नावांच्या मुद्रा आत बसलेल्यांविषयी बरंच काही सांगून जातात. मग या मोटारी नो-पार्किंगमध्ये असोत, त्यांनी सिग्नल तोडलेला असो की, एखाद्या पादचाऱ्याच्या अंगावर गाडी घातलेली असो. त्यांच्यावर कारवाई होणं दूरच, पण त्यांना डावा हात पाठीमागे ठेवून उजव्या हाताने सलाम केला जातो.

‘मावळ’च्या उमेदवारीवरून मदन बाफना नाराज
निष्ठेला महत्त्व नसल्याचा आरोप

पुणे, २७ मार्च/खास प्रतिनिधी

प्रामाणिकपणा, सचोटी आणि निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला पक्षात महत्त्व उरलेले नाही. पक्षाने ठिकठिकाणी सुभेदार तयार केले. हा पक्ष स्वाभिमानी आहे. स्वाभिमान जपण्यासाठी हा वेगळा पक्ष काढला गेला आणि हा स्वाभिमान आता कोठे गेला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते मदन बाफना यांनी आपली नाराजी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.

‘आयएमए’च्या अजेंडय़ाचे राजकीय पक्षांना आव्हान!
पुणे, २७ मार्च / प्रतिनिधी
आरोग्याचे धोरण, डॉक्टरांविषयक कायदे या निर्मिती प्रक्रियेत आयएमए, निमा सारख्या संघटनांचा समावेश, आरोग्याच्या पायाभूत सुविधा, लोकसंख्येच्या तुलनेत त्रोटक पडणारी शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, लसीकरण .. .. यांसारख्या मागण्यांचा हा अजेंडा मांडला आहे डॉक्टरांची संघटना असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए). निवडणुकीची रणधुमाळी आता कोठे सुरुवात होत नाही तोच राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होतील.

चैत्राचा प्रारंभ आणि नववर्षांचे ‘सुरेल’ स्वागत..
पुणे, २७ मार्च/ प्रतिनिधी

सनईचौघडय़ांचे मंगल सूर, अत्तर-गुलाबाने स्वागत, देखणी रोषणाई अशा उत्साही वातावरणात आणि ऐतिहासिक शनिवारवाडय़ाच्या प्रांगणात आज ‘चैत्र पहाट’ला प्रारंभ झाला आणि पुणेकरांनी नवीन वर्षांचे ‘सुरेल’ स्वागत केले.

विद्यापीठ गैरकारभाराविरोधात प्राध्यापकांनी थोपटले दंड
पुणे, २७ मार्च/ खास प्रतिनिधी

पुणे विद्यापीठातील गैरकारभाराच्या विरोधात प्राध्यापक संघटनांनी दंड थोपटले आहेत. समर्थ भारत अभियान योजनेसाठी करण्यात आलेला खर्च व कार्याचे सामाजिक लेखापरीक्षण करण्याबरोबरच भरतीमधील गैरव्यवहार व धमकीसत्राची गुप्तचर खात्याकडून चौकशी करण्याची मागणी प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे.

सहायक आयुक्तपदी दोन अधिकारी नियुक्त
पिंपरी, २७ मार्च / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील करसंकलन आणि जकात विभागाच्या सहायक आयुक्तपदासाठी शासनाने प्रतिनियुक्तीवर दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. करसकंलन विभागासाठी शहाजी पवार तर जकात विभागासाठी अशोक मुंडे यांची शासनाने नियुक्ती केली. पवार हे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तर, मुंडे हे मुंबईतील शिधावाटप केंद्रात उपनिबंधक या पदावर होते. पालिकेच्या करसंकलन विभागाच्या सहायक आयुक्तपदावर मुस्तफा फडणीस यांची नुकतीच निवड करण्यात आली होती. तर, जकात विभागाच्या मुख्य अधीक्षकपदासाठी साहेबराव गायकवाड यांना नुकतीच मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, फडणीस व गायकवाड यांच्याकडील हे विभाग शासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

चिखलीत स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन
पिंपरी, २७ मार्च / प्रतिनिधी
चिखली ग्रामस्थ, विघ्नहर्ता प्रतिष्ठान आणि समन्वय समितीच्या वतीने आयोजित स्वामी विवेकांनद व्याख्यानमालेत उद्या (शनिवार) माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांचे ‘स्मरण त्या देशभक्तांचे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. संयोजक सुदाम मोरे यांनी ही माहिती दिली.
चिखलीतील देहू-आळंदी रस्त्यावर मनपा शाळेजवळ सायंकाळी सात ते नऊ या वेळेत व्याख्याने होतील. शनिवारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गायक पद्माकर कुलकर्णी असतील. रविवारी माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे ‘दहशतवाद आणि भारत’ यावर व्याख्यान होईल. यावेळी अध्यक्षस्थानी ‘लोकसत्ता’चे सहसंपादक संजय आवटे असतील.

राष्ट्रीय समाज पक्षातर्फे विक्रमादित्य धीमान
पुणे, २७ मार्च/प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षातर्फे विक्रमादित्य धीमान पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एन. जी. खरात यांनी आज पत्रकार परिषदेत केली. खरात म्हणाले की, राज्यातील सर्व जागा पक्षातर्फे लढविण्यात येणार आहेत. आतापर्यंत ३२ उमेदवार जाहीर झाले आहेत. देशातील घराणेशाहीला शह देण्यासाठी पक्षातर्फे देशात ३०० जागा लढविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्ष कलमाडींच्या पाठीशी
पुणे, २७ मार्च/ प्रतिनिधी
रिपब्लिकन पक्षाच्या शहर शाखेने जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांच्या पाठीशी आपण उभे राहणार असल्याचे पक्षाच्या वतीने पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. नवनाथ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बैठकीला परशुराम वाडेकर, असित गांगुर्डे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.