Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सिंधू अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षांसह संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
बोगस कर्ज प्रकरण
बुलढाणा, २७ मार्च / प्रतिनिधी

बोगस कर्जप्रकरणी ४ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून नांदुराच्या सिंधू

 

अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह १८ ही संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधू अर्बन सहकारी पतसंस्थेचे खातेदार शंकर सीताराम मोटवानी व कांचन शंकर मोटवानी यांनी या पतसंस्थेकडून गृहतारण कर्ज प्रकरण तयार करून उचित कागदपत्रे तयार केली होती. सिंधू अर्बनचे अध्यक्ष, सर्व संचालकांनी गैरकायदेशीरपणे फसवणूक करून कर्ज नावे टाकले, अशी तक्रार मोटवानी यांनी निबंधक यांच्याकडे केली होती. मात्र, सहकार खात्याने संस्था चालकांची बाजू घेतल्यामुळे अखेर न्यायासाठी त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली.
न्यायालयाच्या निर्देशानुसार नांदुराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सालफळे यांनी सखोल चौकशी केल्यानंतर ‘सिंधू अर्बन’चे अध्यक्ष यशपाल जानवाणी, उपाध्यक्ष डिगांबर रामचंदाणी, मनोहर हरगुणानी, प्रेमचंद उधानी, दौलत बक्शुराम चौथाणी, प्रकाश हरगुणानी, गुरुमुखदास चौधरी, हरेश आहुजा, मनोज रामचंदाणी, दमयंती राजपाल, सुनीता लालचंद आहुजा, गुलाबराव राजपाल, प्रल्हाद खानचंदानी, मोहन रामचंदाणी, कविता आहुजा, विजय आहुजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.