Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अकोल्यात बनावट तंबाखूचा साठा जप्त
अकोला, २७ मार्च/ प्रतिनिधी

बाबा जर्दा या कंपनीच्या बनावट तंबाखूची विक्री अकोल्यात होत असल्याची माहिती

 

मिळाल्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने तीन दुकानांवर छापे घालून ५६ हजारांचा तंबाखुचा साठा गुरुवारी पकडला. या कारवाईत एका जणाला अटक करण्यात आली असून दोघे पसार झाले आहेत.
बाबा जर्दा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला ही माहिती दिली होती. या माहितीवरून भाजीबाजारातील जगदंबा सुपारी स्टोअर्स, सराफा बाजारातील लक्ष्मी पान मसाला आणि खोलेश्वर येथील किराणा दुकानावर छापे टाकण्यात आले. जगदंबा सुपारी स्टोअर्समधून पाच हजार १९४ रुपयांचा, लक्ष्मी पान मसाला येथून ४५ हजारांचा तर खोलेश्वर येथील किरणा दुकानातून ३ हजार ८४४ रुपयांचा बनावट तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसाांनी जगदंबा सुपारी स्टोअर्सचे संचालक घनश्याम अग्रवाल यांना अटक केली असून दोघे पसार झाले आहेत.