Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

महिला व युवक शक्तीच परिवर्तन घडवेल- वर्षां पटेल
गोंदिया, २७ मार्च / वार्ताहर

गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास हवा असेल तर या जिल्ह्य़ातील महिला व युवाशक्ती

 

एकत्र येण्याची गरज आहे. या दोनच शक्ती परिवर्तन घडवू शकतात, असा विश्वास वर्षां पटेल यांनी व्यक्त केला.
गोंदिया तालुक्यातील जनसंपर्क दौऱ्यात वर्षां पटेल, बटाना, आंभोरा, चुलोद, गर्रा येथे बोलत होत्या. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेंद्र जैन, शोभा गणवीर, विनोद हरिणखेडे, शैलेश वासनिक, गणेश बरडे, जगदीश बहेकार, विनोद पटले, शिव नेवारे, पूरन उके, डॉ. घनश्याम शिवणकर, यशवंत सुलाखे, राजेश रामटेके, अंकेश हरिणखेडे, दिगंबर ठाकूर, संजय साठवणे, रहांगडाले, चंद्रकला मोहनेकर,अशोक गौतम, गोविंद ठाकूर, एन.एम. बघेले, शेखर ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ातील लोकांना परिवर्तनाची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले.