Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘विज्ञान मित्र’ पुरस्कार सुरेश चोपणे यांना प्रदान
चंद्रपूर, २७ मार्च / प्रतिनिधी

मराठी विज्ञान परिषदेच्यावतीने विज्ञान प्रसारक सुरेश चोपणे यांना ‘विज्ञान मित्र’ पुरस्कार देऊन

 

गौरवण्यात आले. आनंदवनात साधनाताई आमटे यांच्या हस्ते चोपणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून चोपणे हे विज्ञानाच्या प्रसारासाठी कार्य करीत आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर २००८ मध्ये वरोरा येथे अखिल भारतीय विज्ञान अधिवेशनाचे ते सल्लागार होते. राज्य विज्ञान प्रदर्शनाचेही ते सल्लागार होते. देशातील विविध विज्ञान संस्थेचे सदस्य असून त्यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या ‘राष्ट्रीय विज्ञान प्रसारक व संशोधक’ पुरस्कार देऊन त्यांना २००७ मध्ये राष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आले होते. या कार्याची दखल घेऊनच त्यांचा हा सन्मान करण्यात आला. ४३ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे अध्यक्ष माधव चव्हाण, स्वागताध्यक्ष संजय देवतळे, प्रा. सुधीर देशमुख व कौस्तुभ आमटे यांनी मानपत्राद्वारे प्रा. चोपणे यांचे अभिनंदन केले आहे. वरोरा येथील आनंदवनात ‘विज्ञान मित्र’ पुरस्कार सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबा आमटे यांच्या कर्मभूमीत त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात मराठी विज्ञान परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सुधीर देशमुख, मनोहर सदाफळ, मंडल, प्रकाश बोरा व नवले उपस्थित होते.