Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

ग्रामपंचायत निवडणुकीवरून इंझाळ्यात संघर्ष, २५ अटकेत
हिंगणघाट, २७ मार्च / वार्ताहर

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी तालुक्यातील इंझाळा येथे शिवसेना व राष्ट्रवादी

 

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उद्भवलेल्या संघर्षांत चारजण जखमी झाले. याप्रकरणी २५ जणांना अटक करण्यात आली.
इंझाळा येथे बुधवारी ग्रामपंचायत निवडणूक झाली. या संदर्भात सेनेचे तानबाजी सायंकार यांच्या घरी बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आटोपून परतत असताना पान टपरीवर उभ्या असलेल्या २५ ते ३० आरोपींनी त्यांना अडवून लाठय़ाकाठय़ाने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्यासह चारजण जखमी झाले. दुर्वे यांच्या तक्रारीवरून गजानन लाडेकार, मुरलीधर सायंकार, अंकुश सायंकार, अरुण सायंकार, विनोद मुरले, अशोक लाडीकर, बळवंत भलमे, दिलीप भुते, चंद्रकांत सायंकार, गजानन दांडेकर, बाबा बसाके, संतोष टिपले, विजय मुरले, गजानन इटनकर, विनोद चिंचोळकर, जयंत वाटगुळे, मनोज बसाके, सचिन भुते व आनंदराव लाडीकर या २० जणांना अटक करण्यात आली. इतर १० आरोपी फरार आहेत. दुसऱ्या गटाचे दिलीप गोविंदराव मुटे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार आरोपींनी बैठकीहून परत येत असताना वाद घातला व मारहाण केली असे म्हटले आहे. या तक्रारीवरून आरोपी देवानंद दुर्वे, अरुण देऊळकर, विजय देऊळकर, नीलेश मुटे व खुशाल देऊळकर यांना अटक करण्यात आली.