Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘क्रिकेटमुळे एकसंघतेची भावना वाढीस लागते’
खामगाव, २७ मार्च / वार्ताहर

क्रिकेटसारख्या खेळांमधून युवकांमध्ये एक संघतेची, एकतेची भावना वाढीस लागते. ही एकतेची

 

भावना समाज जीवनामध्ये सुद्धा कायम ठेवून युवकांनी आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन आमदार दिलीप सानंदा यांनी केले.
खामगाव तालुक्यातील पारखेड येथे शिवबा क्रीडा मंडळ व आदिवासी पारधी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार सानंदा चषक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोह कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एन.एस.यू.आय. चे जिल्हाध्यक्ष सचिन जैसवाल, पारखेडचे माजी सरपंच लयनसिंग सोळंके, रामदास सपकाळ, मोहनसिंग बॅनर्जी, अशोक देशमुख आदी उपस्थित होते.प्रारंभी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे शाल, श्रीफळ व हार देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर या स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या रसुलपूर येथील डायमंड क्रिकेट संघ, द्वितीय गजानन क्रिकेट क्लब वाडी, तृतीय कनारखेड येथील तिरंगा क्रिकेट क्लब, चतुर्थ माटरगाव येथील जिजामाता क्रिकेट संघ आदींना बक्षीस वितरण करण्यात आले.
मॅन ऑफ दि सिरीज म्हणून कैलास राठोड व मॅन ऑफ दि मॅच म्हणून विष्णू टाले यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत ४३ संघांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे संचालन मंगलसिंग राठोड यांनी, प्रास्ताविक नरसिंग सोळंके यांनी तर आभार रमेश राठोड यांनी मानले.यावेळी सदाशिव लाहुडकार, वासुदेव राऊत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश राऊत, सरपंच सूर्यभान इंगळे, रामदास गावंडे, रमेश काळशे, नरेंद्र सननसे, भाऊराव पाटील, रमेश राठोड, धोंडु टाले, सुधाकर डोबे, पांडुरंग सोनोने, राजेंद्र थोरात, शिवाजी खाडे, आश्विन पाटील, विनोद धोरंधर, घारोडचे सरपंच वराडे, निवृत्ती घोराडे, भगवान ढगे, दिनकर तळपते, गजानन तळपते, गजानन पाटील, भास्कर सोळंके, रामभाऊ मोरे, उपस्थित होते.