Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सावंगीत आज ‘गझल मैफल’
वर्धा, २७ मार्च / प्रतिनिधी

गझलगायक भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाचा ‘गझल मैफ ल’ हा कार्यक्रम २८ मार्चला

 

वर्धा श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने सावंगी येथे आयोजित करण्यात आला असून त्यांच्याच नेतृत्वाखाली २९ मार्चला गझल लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कविश्रेष्ठ सुरेश भट यांनी ‘गझलनवाज’ या उपाधीने संबोधलेल्या भीमराव पांचाळे यांच्या गझलसागर प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गझल संमेलन आयोजित करण्यात येते. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता होणाऱ्या ‘गझल उसने छेडी’ या कार्यक्रमापूर्वी पत्रकार संघाच्या वतीने पांचाळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याच निमित्ताने अध्ययन भारती व बजाज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित गझल लेखन व गायन कार्यशाळेत पांचाळेंसह अन्य मान्यवर नवोदितांना मार्गदर्शन करतील.
वाचनालयाच्या सभागृहात २९ मार्चला ‘गझल सत्र’ चालणार आहे. सकाळी ९ वाजता प्रारंभ होणाऱ्या पहिल्या सत्रात उद्घाटन व त्यानंतर ‘गझल इतिहास’ या विषयी मुंबईचे डी.एन. गांगण विचार व्यक्त करतील. दुपारी ११ वाजता गझलकार संगीता जोशी (पुणे) यांचे गझल लेखनाचे तंत्र-मंत्र यावर व्याख्यान होईल. दुपारी २ वाजता गझल मैफ ल व मुशायराच्या संचालनाबाबत निवेदक दत्ता बाळसराफ (मुंबई) यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर प्रष्टद्धr(२२४)्नाोत्तराचे सत्र होणार असून उपस्थित मान्यवर नवोदितांचे शंकानिरसन करतील.
नव्याने काव्यलेखन व गझल गायन करणारे तसेच गझलेत रूची ठेवणाऱ्यांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असा आशावाद संयोजक संजय इंगळे तिगावकर यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सायंकाळी ५ वाजता ‘गझल संगम मुशायरा’ आयोजित करण्यात येणार असून यात विदर्भातील निवडक गझल गायक सहभागी होणार आहेत. इच्छुकांची कार्यशाळेत पूर्णवेळ उपस्थिती शक्य व्हावी म्हणून चहा, नाश्ता व भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गझलप्रेमींनी यास प्रतिसाद देण्याचे आवाहन वाचनालयाच्या दीपमाला कुबडे व अध्ययन भारतीचे नाटय़कर्मी हरीश ईथापे यांनी केले आहे.