Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शेतकरी कर्जमाफी माहिती केंद्राचे उद्घाटन
रिसोड, २७ मार्च / वार्ताहर

जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची माहिती देण्यासाठी देवदूत परिवाराकडून ‘कर्जमाफी माहिती

 

केंद्र’ उघडण्यात आले आहे. केंद्रावर आजपर्यंतच्या सर्व कर्ज व व्याजमाफी संदर्भातील शासन परिपत्रके ठेवण्यात आली आहेत. परिपत्रकानुसार कर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० जून २००९ आहे, तर कर्जमाफी परिपत्रकानुसार ३१ मार्च २००७ च्या आधी घेतलेले २० हजार रुपयांच्या आतील कर्ज आणि व्याज दोन्ही माफीस पात्र आहेत.
या केंद्राचे उद्घाटन नारायण बोरकर, राजाराम चोपडे, शरदचंद्र हजारी, रामराव जाधव, भुजंगराव खरात, शंकरसिंह बैस, तुकाराम बाजड, प्रकाश बोडखे, उत्तम तुरुकमाने, रसुल वाकदवाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विष्णुपंत भुतेकर, डॉ. जितेंद्र गवळी, विजय गाडे, खुशाल ढोणे, मंचक जाधव, प्रकाश देशमुख, बाजीराव पाटील, महावीरसिंह ठाकूर, प्रभाकर बाजड, रंजित साबळे, बबन पाचरणे, पुरुषोत्तम रंजवे, संजय सदार, दत्तराव मापारी, भाना पाटील उपस्थित होते.