Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

ऋषीसंकुलात संभाजी महाराज पुण्यतिथी
खामगाव, २७ मार्च / वार्ताहर

भय्युजी महाराज प्रणीत ऋषीसंकुलात राजे संभाजी महाराज पुण्यतिथी ‘बलिदान-दिन’ म्हणून

 

पाळण्यात आली. यावेळी ऋषीसंकुलच्या संचालकांच्या हस्ते संभाजी महाराज पुतळ्याला हार घालून पूजन करण्यात आले.
यावेळी बाबुजी थानवी म्हणाले की, संभाजी महाराजांना साखळदंडाने जखडलेल्या अवस्थेत औरंगजेबाच्या दरबारात हजर केले तेव्हा औरंगजेब सिंहासन सोडून उभा राहिला. अशा प्रकारचे प्रभावी व्यक्तिमत्त्व संभाजी महाराजांचे होते.
औरंगजेबाने अनेक प्रलोभने दाखविली; परंतु संभाजी महाराजांनी सर्व प्रलोभने ठोकरत वीर मरण पत्करले. संभाजी महाराजांना मृत्यूचे भय नव्हते. जन्म जरी आपल्या हाती नसला तरी मृत्यू आपल्या हाती असल्यामुळे प्रेरणादायी मृत्यू झाला पाहिजे. संभाजी महाराजांप्रमाणे निर्भय जीवन जगण्याची प्रेरणा घेतली पाहिजे, असेही बाबुजी थानवी म्हणाले.
या कार्यक्रमाला ऋषीसंकुलचे प्रशासक एन.टी. देशमुख, सतीश राठी, राजकुमार गोयनका, संभाजी महाराज संरक्षण समितीचे अजय देशमुख, श्रीकांत टाले, अभिजित देशमुख, अनिल जाधव, सुरेश गिते उपस्थित होते. यावेळी भाऊराव पाटील, भागवत बुरगे, शिवाजी देशमुख उपस्थित होते.