Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार!
बुलढाणा, २७ मार्च / प्रतिनिधी

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. आघाडी धर्माचे संपूर्ण पालन करून

 

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना संपूर्ण शक्तीसामर्थ्यांसह मदत करण्याचे आश्वासन बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमेटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिले.
बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक व जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय अंभोरे होते. मेळाव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन बोंद्रे, माजी जिल्हाध्यक्ष श्याम उमाळकर, माजी आमदार कृष्णराव इंगळे, ज.ेके. खरात, आमदार दिलीपकुमार सानंदा, राकाँचे जिल्हाध्यक्ष तोताराम कायंदे, डॉ. राजेंद्र गोडे, हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, सभापती दिलीप जाधव, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष नंदा कायंदे, जिल्हाध्यक्ष मीनल आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.