Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

प्रफुल्ल पटेलांचा सदिच्छा दौरा
भंडारा, २७ मार्च / वार्ताहर

केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री आज भंडाऱ्यात संपर्क दौरा केला. घरोघरी सदिच्छा भेटीकरिता कुणाच्या खांद्यावर हात ठेवत, कैसे हो, अशी विचारणी करीत ते फिरले. अनेकांना विमान वाहतूक मंत्री जमिनीवर बघून आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी या उपक्रमाबद्दल पटेलांची वाहवा केली, तर अनेकजणांनी ‘हा निवडणुकीचा फंडा आहे’ अशी प्रतिक्रिया दिली.
हे संपर्क अभियान सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चालले. हातमाग महामंडळाचे अध्यक्ष धनंजय दलाल, नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाबू बागडे, महासचिव डॉ. जगदीश

 

निंबार्ते, अर्बन बँकेचे संचालक डॉ. जयंत वैरागडे, नगरसेवक अ‍ॅड. विनयमोहन पशिने, नगराचे उपाध्यक्ष रुबी चढ्ढा इत्यादींसोबत प्रफुल्ल पटेलांनी टाकळी (भगतसिंग वॉर्ड) शास्त्रीनगर, नाशिकनगर, शुक्रवारी, लाला लजपतराय वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, पटेलपुरा, रमाबाई आंबेडकर वॉर्ड, विद्यानगर, विदर्भ हाऊसिंग कॉलनी, राजगोपालाचारी वॉर्ड, तकिया वॉर्ड, मुस्लिम लायब्ररी परिसर, डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, सिंधी कॉलनीमध्ये मान्यवरांच्या भेटी घेतल्या.