Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

हंसराज अहीर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
चंद्रपूर, २७ मार्च/प्रतिनिधी

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार हंसराज

 

अहीर उद्या, शनिवारी सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करणार आहेत. याप्रसंगी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, शोभा फडणवीस, विश्वास नांदेकर, मदन येरावार, संदीप धुर्वे, माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, दिवाकर पांडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाळू धानोरकर, रमेश तिवारी, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, विजय राऊत, उद्धव येरमे, दिनकर पावडे, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, खुशाल बोंडे, माजी शिवसेना जिल्हा प्रमुख दिलीप कपूर, दीपक बेले, संदीप आवारी, अनिल वनकर, प्रवीण खनके, कुसुम उदार, वनिता कानडे, जि.प. गटनेते संदीप कपरे, सुभाष कासनगोट्टवार हजर राहणार आहेत. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा-शिवसेना युतीच्यावतीने करण्यात आले आहे.