Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

युवक काँग्रेसची भूमिका महत्त्वाची- कौर
पुलगाव, २७ मार्च / वार्ताहर

काँग्रेस पक्ष बळकट करण्यात युवक काँग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष व जिल्ह्य़ाच्या निरीक्षक अरविंदर कौर यांनी येथे केले.

 

स्थानिक पुलगाव कॉटन मिलच्या कामगार भवनात जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. पंकज भोयर, देवळी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नीलेश गावंडे यांच्या उपस्थितीत युवा कार्यकर्त्यांची सभा संपन्न झाली. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने सभेची सुरुवात झाली. डॉ. भोयर यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या समस्या मांडल्या. काँग्रेस समितीचे अध्यक्ष रमेश सावरकर, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष रामेश्वर वाघ, अश्विन शहा, मौला शरीफ यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन चारुदत्त वंजारी यांनी केले, तर विलास कडू यांनी आभार मानले. या सभेला भगवान कडू, जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव गोविंद दैय्या, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजू पाठक, सरचिटणीस संजय दाबोडे, बंटी श्रीवास व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.